Farmers 
जळगाव

जळगावः 12 हजार पात्र शेतकऱ्यांना फळपिक विमाची मिळणार रक्कम

ही रक्कम लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केली जाणार आहे.

भूषण श्रीखंडे

जळगाव : प्रधानमंत्री पिक विमा योजना (Pradhan Mantri Pik Vima Yojana) अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना (Fruit insurance plan) 2020-21अंतर्गत अंबिया बहारामध्ये जळगाव जिल्ह्यातील १२ हजार ८४७ शेतकऱ्यांनी (Farmers) फळपिक विमा काढले होते. यात केळी, डाळिंब, मोसंबी या फळांचा विमा शेतकऱ्यांनी काढलेला होता. आलेल्या आस्मानी संकटामूळे शेतकऱ्यांना या विमाचा लाभ मिळावा यासाठी खासदार उन्मेश पाटील यांचे प्रयत्न सुरू होते. त्याच्या पाठपुरावा नुसार दिवाळी सणाच्या तोंडावर जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २८ कोटीची रक्कम मंजूर झाली आहे.

जळगाव खासदार उन्मेश पाटील यांनी सचिव (कृषि) महाराष्ट्र राज्य मुंबई यांना विमा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तात्काळ विम्याची मंजूर रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्याबाबत 7 ऑक्टोबर 2021 रोजी पत्राद्वारे मागणी केली होती. त्या अनुषंगाने संबंधित विमा कंपनीकडून मिळालेल्या माहितीनूसार जळगाव जिल्ह्यातील 12 हजार 847 पात्र विमाधारक शेतकऱ्यांना 28 कोटी 3 लाख 62 हजार 346 रुपये मंजूर झालेले आहे. ही रक्कम लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केले जाणार असल्याची माहिती खासदार उन्मेश पाटील यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांना दिवाळीचा गोडवा..

गेल्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे आधीच शेतकरी बांधवांचे आर्थिक कंबरडे मोडले असतांना ही मदत मिळाल्याने शेतकरी बांधवांना ऐन दिवाळीत नुकसान भरपाई मंजूर झाल्याने दिलासा मिळणार आहे. मदत मंजुरीसाठी खासदार पाटील यांचा वेळोवेळी केलेला पाठपुरवा महत्वाचा ठरला आहे.

रक्कम पात्र लाभार्थी तालुका व पिकनिहाय

- भडगाव ः 51 शेतकरी रू.5,09,924

- चाळीसगाव 12 शेतकरी रू.4,42,395

- धरणगाव ः 34 शेतकरी रू.5,78,685

- एरंडोल ः 5 शेतकरी रू 1,02,242-

- जळगाव ः 3411 शेतकरी रू 6,96,34,431

- पाचोरा ः 245 शेतकरी रू 58,21,761

- पारोळा ः 2 शेतकरी रू 5700

- रावेर ः 2969 शेतकरी रू 6,08,27,512

- मुक्ताईनगरः 1633 शेतकरी रू 4,54,86,945

- जामनेर ः 44 शेतकरी रू 10,45,372

- चोपडा ः 1364 शेतकरी रू 2,77,59,165

- भुसावळ ः 18 शेतकरी रू 3,90,225

- बोदवड ः 18 शेतकरी रु 2,61,900

- यावल ः 3041 शेतकरी रू 6,74,96,089

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT