जळगाव

जळगाव जिल्ह्यातील २६ टक्के नागरिकांमध्ये आहे कोरोनाच्या‘ॲन्टिबॉडी’ 

देविदास वाणी

जळगाव  : जिल्ह्यातील नागरिकांमध्ये कोरोना ‘ॲन्टिबॉडी’ तयार झाल्या किंवा नाही, याच्या तपासणीसाठी केंद्राच्या पथकाने दीड महिन्यापूर्वी जिल्ह्यातील विविध गावांना भेटी देऊन ४०० जणांचे सॅम्पल घेतले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, २६ टक्के नागरिकांमध्ये ‘ॲन्टिबॉडीज’ आढळल्या आहेत. त्यांना ‘कोरोना’ होऊन गेला, मात्र त्यांना त्यांची लक्षणे जाणवली नाहीत. त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असल्याने त्यांनी ‘कोरोना’ला प्रतिकारशक्तीच्या जोरावर परतावून लावले. 

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. सी. चव्हाण म्हणाले, की दीड महिन्यापूर्वी केंद्रीय पथकाने जिल्ह्यात विविध ठिकाणी ‘सिरो सर्व्हे’ केला होता. त्यात वॉर्ड ५७ (जळगाव महापालिका), वॉर्ड २८ (चाळीसगाव), वॉर्ड ४ (भुसावळ), मोहराळे (ता. यावल), तांदलवाडी (ता. रावेर), कडगाव (जळगाव), धरणगाव, वरखेडे (ता. भडगाव), नाईकनगर (ता. पाचोरा), गोराडखेडा (ता. जामनेर) या ठिकाणच्या नागरिकांच्या रक्ताचे नमुने (सॅम्पल) घेतले होते. 

नमुने घेतलेल्या नागरिकांमध्ये ‘ॲन्टिबॉडी’चे प्रमाण किती, याची माहिती नमुन्याचा अहवाल मंगळवारी (ता. ६) आला. त्यात ४०५ नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेतले होते. त्यांपैकी १०५ जणांना अहवाल पॉझिटिव्ह आला. हे प्रमाण २५.९ टक्के आहे. यावरून २६ टक्के नागरिकांना कोरोना झाला. मात्र त्यांना ते कळालेही नाही. त्यांची प्रतिकारशक्ती चांगली होती. त्यांनी कोरोना संसर्ग न होण्याची वेळोवेळी काळजी घेतली होती. सॅम्पलची तपासणी चेन्नई, नवी दिल्ली येथे झाली. 

 
‘कोरोना’च्या टक्केवारीसाठी सर्व्हे 
सर्वसामान्य व्यक्तींमध्ये कोरोनाची लागण कितपत झाली आहे, हे जाणून घेण्यासाठी ‘सिरो सर्व्हे’ करण्यात येतो. व्यक्तीच्या रक्तद्रवामधील ॲन्टिबॉडीचा शोध याद्वारे घेतला गेला होता. 


अजून सहा महिने ‘कोरोना के साथ’ 
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे ही चांगली बाब आहे. मात्र अजून किमान सहा महिने तरी ‘कोरोना’सोबत घालवावे लागतील. ‘हत्ती जातो अन् शेपूट राहते’ त्यानुसार शेपूट अधिक त्रासदायक ठरणार आहे. नागरिकांना कोरोना न होण्यासाठी अधिकाधिक काळजी घेणे गरजेचे आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT