जळगाव

जळगाव जिल्ह्यात २३७ जण झाले आज कोरोनामुक्‍त !  

भूषण श्रीखंडे

जळगाव  : जिल्ह्यात कोरोना संसर्ग आजाराचा वेग गेल्या महिन्याभरापासून मंदावला आहे. मागील चार दिवसात दीडशेच्या घरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून गुरूवारी शंभरच्या आत रुग्णसंख्या होती. यात आज शुक्रवारी (ता. २३) थोडी वाढ ढाली असून जिल्ह्यात दिवसभरात केवळ १२७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, २३७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 

सलग तीन-चार आठवड्यांपासून जिल्ह्या‍तील कोरोनाचा उद्रेक कमी झाला आहे. रुग्णसंख्या कमी आढळून येत असून, बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे एकूण बाधित आणि बरे झालेल्‍या रुग्णसंख्येतील तफावत कमी झालेली आहे. शुक्रवारी जिल्ह्या‍त एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५२ हजार ५१५ झाली आहे, तर बरे होऊन घरी गेलेल्‍या संख्या ४९ हजार ८१६ वर पोचली आहे. तर आज कोरोनामुळे दोन जणांचा मृत्‍यू झाला आहे. 

जामनेर मध्ये रुग्ण अधिक
सुरवातीला जळगाव शहरात सर्वाधीक कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते. परंतू जळगाव शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून गेल्या महिनाभरापासून जामनेर शहरात कोरोना रग्ण मात्र कमी होत नसल्याचे दिसत आहे. आज ही सर्वाधीक चाळीस कोरोना रुग्ण जामनेर मधे सापडलेले आहे. 


असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर २९, जळगाव ग्रामीण १,  भुसावळ १९, अमळनेर ५,  चोपडा १४, भडगाव ४, यावल ५, जामनेर ४०, रावेर ३, पारोळा ३, चाळीसगाव ५,  बोदवड १ याचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; विसर्जन मिरवणुकीमुळे पीएमपी बसच्या मार्ग आणि स्थानकांत बदल, हे आहेत पर्यायी मार्ग

Bank News : ग्राहकांसाठी रविवारी बँका सुरू; २८ ते ३० सप्टेंबरच्या संपाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Nanded Farmers: ‘काजू-बदाम खा, पण शेतकऱ्यांना न्याय द्या’; अर्धापुरात काँग्रेसचा जनाक्रोश, घंटानाद करून दुष्काळ जाहीर

मुंबईकरांचा प्रवास सुसाट! ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी मार्गासह 'ठाणे-बोरिवली'साठी दुय्यम कर्ज; सरकारचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी महापालिकेची तयारी

SCROLL FOR NEXT