sakal impact
sakal impact 
जळगाव

...अखेर ९१ लाख शासन खात्यात वर्ग

सुनील पाटील

चोपडा : जिल्ह्यातील अनुदानित माध्यमिक शाळांचे वेतन व भविष्यनिर्वाह निधीबाबत कार्यवाहीसाठी नियुक्त असलेल्या वेतन पथक कार्यालयाने चक्क सात निवृत्त शिक्षकांना दोनदा ‘पीएफ’चे वाटप केले होते. यासंदर्भात ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित करून या कार्यालयाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आणल्यानंतर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, शिक्षण सचिव, शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. तसेच वृत्ताची दखल घेत पुणे येथील शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल पाठविण्याचे आदेश दिले असल्याची माहिती मिळाली आहे. 
चोपडा तालुक्यातील पाच, तर जळगाव तालुक्यातील दोन अशा सात सेवानिवृत्त शिक्षकांना ४ जुलैला ९१ लाख रुपये भविष्यनिर्वाह निधीपोटी अदा करण्यात आले होते. याच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पुन्हा २२ जुलैला ९१ लाख रुपये जमा करण्याबाबत धनादेश जिल्हा सहकारी बँकेत जमा करण्यात आला. जिल्हा बँकेत मुख्य शाखेत चौकशी केली असता, वेतन पथकामार्फत देयक कोषागारातून दोनदा मंजूर करून ही रक्कम कोणतीही खात्री किंवा तपासणी न करता वेतन पथकातील लिपिक कीर्ती पाटील, सहाय्यक लेखाधिकारी हेमंत निंबाळकर, तत्कालीन अधीक्षक स्वाती हवेले, प्रभारी अधीक्षक अजित तडवी यांनी दोन वेळा सदर रकमा बँकेत जमा केल्या असल्याचे निदर्शनास आले. याबाबत वेतन पथकाकडून तातडीने हालचाली सुरू झाल्या असल्या तरी याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी माध्यमिक शिक्षक संघटनेचे सरचिटणीस एस. डी. भिरुड यांनी लावून धरली आहे. 

वेतन पथक बँकेत तळ ठोकून 
दोनदा जमा झालेली रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तालुका शाखेवरून परत मागविण्यासाठी सोमवारी जळगाव वेतन पथकातील लिपिक कीर्ती पाटील, सहाय्यक लेखाधिकारी हेमंत निंबाळकर, प्रभारी अधीक्षक अजित तडवी हे सकाळी अकरापासून ते अडीचपर्यंत बँकेत तळ ठोकून होते. पथकातील या कर्मचाऱ्यांनी ९१ लाख रुपयांची रक्कम परत मागवून ती शासनाच्या खात्यात चलनाद्वारे वर्ग केली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेकडून करण्यात येत आहे. 

एकाच महिन्यात सात सेवानिवृत्त शिक्षकांच्या खात्यात ९१ लाख रुपये वर्ग केले असल्याची बाब उघडकीस आली. मात्र, असे प्रकार पूर्वी झाले नसावेत का? संगनमत करून गहाळ करण्याचा तर काही प्रकार नसेल ना? याबाबत सखोल चौकशी व्हावी. 
-एस. डी. भिरुड, सरचिटणीस, माध्यमिक शिक्षक संघटना, जळगाव 

संपादन : राजेश सोनवणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT