जळगाव

जळगावच्या तरूणाची झेप; शेतकरी कुटूंबातील 'राहुल' झाला असिस्टंट कमांडंट  ​

राजेश सोनवणे

जळगाव : तालुक्यातील आव्हाणे येथील शेतकरी कुटूंबातील राहुल वसंत पाटील याने युपीएससी (सीएपीएफ) परीक्षेमध्ये असिस्टंट कमांडंट (डीवायएसपी) परीक्षा संपुर्ण भारतातून ७३ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. परिस्थिती बेताची असतांना खडतर प्रवास करत त्याने नेत्रदिपक कामगिरी करत स्वप्नपुर्ती केली आहे.

आव्हाणे येथील राहुलचे वडील (कै.) वसंत तुळशीराम पाटील हे शेतकरी होते. घरची परिस्थिती बेताची असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या दोघा मुलांचे इंजिनिअरींग शिक्षण पुर्ण केले. राहुलचे प्राथमिक शिक्षण हे आव्हाणे येथील मराठी मुलांची शाळा येथे झाले; तर माध्यमिक शिक्षण साकेगाव येथील जवाहर नवोदय विद्यालय येथे झाले. 

नोकरी सोडून परिक्षेची तयारी 
राहुलने महाराष्ट्रातील नामांकीत मुंबईच्या व्हीजेटीआय कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. त्यानंतर चांगल्या पगाराची लागलेली नोकरी सोडून त्याने युपीएससी तयारी करण्याचे ठरवले. मोठे भाऊ माऊली क्लासेसचे संचालक श्री रवि पाटील यांनी सुद्धा त्याला यासाठी प्रोत्साहन दिले व खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे राहिले. त्याच्या या यशाचे त्याच्या कुटुंबियांना कडून व गावकऱ्यांकडून सर्वत्र अभिनंदन होत आहे.  

 
संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT