Fireworks 
जळगाव

उत्तर महाराष्ट्रातील फटाके बंदीचा निर्णय रद्द-मुख्य सचिवांचे आदेश

देविदास वाणी


जळगाव ः दिवाळीत जळगावसह नाशिक, धुळे, नंदुरबार, नगर जिल्ह्यात फटाके (Fireworks) विक्री व फोडण्यास बंदी करण्याचे आदेश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Divisional Commissioner Radhakrishna Game) यांनी नुकतेच काढले होते. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून संबंधित पालिका, महापालिका, नगरपरिषदांमध्ये फटाके बंदीचे ठराव सभा घेवून करायला सांगितले होते. असे असताना आज राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (Chief Secretary Sitaram Kunte) यांनी फटाके बंदीचा आदेश मागे घेण्याचे पत्र दिले आहे.

फटाक्यांवर बंदी विभागीय पातळीवर पहिल्यांदाच घालण्यात आल्याने स्थानिकांसह फटाके विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी होती. जळगाव जिल्हा फटाके व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारीच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेवून विभागीय आयुक्तांचा निर्णय मागे घेण्याबाबत पत्र दिले होते. विभागीय आयुक्तांच्या या निर्णयावर हिंदुत्ववादी संघटनांनीही नाराजी व्यक्त केली होती.

या कारणाने घातली होती बंदी
विभागीय आयुक्तांनी शासनाच्या माझी वसुंधरा अभियानाचा संदर्भ देत हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी फटाके बंदीचा ठराव करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचे प्रारूप टूलकीटनुसार फटाके बंदीसाठी पुढाकार घेण्यात आला असून, पर्यावरण संवर्धन व हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शंभर गुण देण्यात आले आहेत. दिवाळीत फटाक्यांमुळे वातावरण दुषीत होते. शहरी भागात अधिक प्रमाण असल्याने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात फटाक्यांच्या विक्री व वापरावर बंदी घालण्याच्या दृष्टीने ठराव करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले होते.



फटाके असोसिएशनचे कार्याध्यक्ष यूसुफ मकरा यांनी सांगितले, की आजच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मध्यस्थी करत फटाके बंदीचा तिढा सोडवला. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी हा निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर केले. राष्ट्रीय प्रदुर्षण नियंत्रण विभागातर्फे प्रमाणित केलेले असतात. असेच फटाके आम्ही विकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT