bus.jpg 
जळगाव

"एसटी' बघतेय प्रवाशांची वाट; मालवाहतुकीलाही अल्प प्रतिसाद 

सकाळवृत्तसेवा

जळगाव : बाहेर गावी जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीत उत्तम पर्याय असलेली राज्य परिवहन महामंडळाची "एसटी'ला प्रवाशांची प्रतीक्षा आहे. प्रवासी आणि महामंडळ यांच्यात एक वेगळे नाते मानले जातेय. म्हणूनच लालपरी ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी ठरली आहे. ऐरवी एसटीची प्रतीक्षा करत थांबणाऱ्या प्रवाशांचीच वाट पहात थांबावे लागत आहे. 
कोरोना व्हायरसमुळे दोन- अडीच महिन्यांपासून लॉकडाउन सुरू आहे. लॉकडाउनमुळे "एसटी'ची चाके देखील थांबलेली आहेत. यातून बाहेर निघण्यासाठी पंधरा दिवसांपूर्वी जिल्हातंर्गत बस फेऱ्या सुरू करण्याचे आदेश होते. परंतु, प्रवासी मिळत नसल्याने बस रिकाम्या फिरत आहेत. यामुळे मालवाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. अशा स्थितीत देखील काही प्रवासी फेऱ्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत. 

दिवसभरात पंधरा फेऱ्या 
पंधरा दिवसांपूर्वी जिल्हा अंतर्गत प्रवासी बसफेऱ्या सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर जळगाव विभागाकडून फेऱ्या सोडण्यात येत होत्या. सुरवातीला अडीचशे ते दोनशे फेऱ्या सोडण्यात येत असताना यातून केवळ तीनशे ते साडेतीनशे प्रवासी जात होते. यामुळे नफा कमी तोटा जास्त अशी स्थिती "एसटी'ची झाली होती. प्रवासी मिळत नसल्याने फेऱ्या कमी कराव्या लागल्या असून, आता दिवसभरातून केवळ पंधरा फेऱ्या सुरू आहेत. 

मालवाहतुकीलाही प्रतिसाद अल्प 
प्रवासी वाहतूक करणारी "एसटी' ही मालवाहतूक ट्रक झाली. गेल्या आठवड्यात जळगाव विभागातून यवतमाळसाठी पहिली फेरी मिळाल्यानंतर सेवेचा शुभारंभ झाला. परंतु, याला मिळणारा प्रतिसाद देखील अल्प असून, आतापर्यंत केवळ वीस- पंचवीस मालवाहतुकीच्या फेऱ्या झाल्या आहेत. यामुळे या फेऱ्यांमधून देखील उत्पन्न फारसे मिळत नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महत्त्वाची बातमी! आता लग्नपत्रिकेवर वधू-वरांची जन्मतारीख अनिवार्य; २४ तास मॉनिटरिंग होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Video: PSLवाल्यांची 'पंचायत'! युद्धबंदीचे क्रेडिट क्रिकेटच्या मैदानात, उडवला कबुतर अन्..

Chardham Yatra 2026: केदारनाथमध्ये विशेष पूजा महागली! हेलिकॉप्टरच्या दरातही बदल; पहा नवीन रेट लिस्ट आणि खर्चाचा तपशील

Hyundai Creta Price : ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लाँच! कमी किंमतीत जास्त फीचर्स, पाहा

C.D. Gopinath passed away: भारताच्या पहिल्या कसोटी विजयाचा शेवटचा शिलेदार हरपला; झोपेतच घेतला शेवटचा श्वास...

SCROLL FOR NEXT