deth deth
जळगाव

'मीच होतो दुनियेतून ऑफ' व्हॉट्सॲप स्टेटस ठेवत तरुणाची आत्महत्या

माझ्या छोट्याशा जीवनाचा प्रवास खूप छान केला.

रईस शेख्



जळगाव : जळगाव शहरात २९ वर्षीय विवाहीत तरुणाने व्हाॅसअपवर (WhatSapp) स्टेटस ठेवून आत्महत्या (suicide) केल्याची खळबजणक घटना घडली. या घटनेमुळे त्याच्या कुटूंबासह मित्रपरीवाला मोठा धक्काच बसला. तर कुटूंबाचा आक्रोश न पाहवणार होता.

(whatsapp status posting and young man suicide)

शहरातील अयोध्यानगर परिसरातील सद्‌गुरूनगर तृप्ती कॉर्नरजवळ राहणाऱ्या प्रेमनाथ महाजन हे कुटूंबासह राहतात. त्यांचा मुलगा हर्षल महाजन (वय २९) याने रात्री जेवण केल्यानंतर हर्षल मागच्या खोलाती जाऊन झोपला होता. पहाटेसाडेचारच्या सुमारास वडील प्रेमनाथ महाजन यांनी हर्षलच्या खोलीत बघीतले असता त्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. हे दृष्य पाहून कुटूंबाला मोठा धक्काच बसला.

चार महिन्यापूर्वीच झाले होते लग्न

हर्षलचे चार महिन्यापूर्वी लग्न झाले होते. परंतू काही दिवसापूर्वी पत्नी सोबत वाद झाल्याने पत्नी माहेरी निघून गेली होती. त्यामुळे काही दिवसापासून हर्षल नैराश्यात होता. त्यातच त्याने टोकाचे असे पाऊल उचले.

घटनास्थळी पोलीस

घटनेची माहिती कळताच अंमलदार हेमंत कळस्कर, चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह खाली उतरविला व जिल्हा रुग्णालयात रवाना केला. मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हर्षल महाजन याला मृत घोषित केले. याबाबत एमआयडीसी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.

असे ठेवले होते स्टेटस..

‘माझ्यामुळे लोकांचे मूड ऑफ झाले, पण मी स्वतः दुनियेतून ऑफ होत आहे. मी माझ्या छोट्याशा जीवनाचा प्रवास खूप छान केला. काही लोकांच्या मनावर, अनेकांच्या डोक्यात अधिराज्य केले आणि मित्रपरिवार छान लाभला. माझे आई-वडील दुनियेतील खूप छान देवमाणूस आहेत. पुढचा जन्म त्यांच्या पोटी व्हावा, ही देवाला प्रार्थना करतो आणि मी कोणालाही यास जबाबदार समजत नाही. कोणाला काही चुकीचे बोलले गेले असेल, तर माफी मागतो. मला माफ करा,’ असे स्टेटस ठेवून हर्षलने जगाचा निरोप घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: न्यायव्यवस्थेवर टीका करण्यास आक्षेप नाही, पण... सर्वोच्च न्यायालयाचा इशारा, दिली कौतुकास्पद शिक्षा

सगळीकडे 'डाइनिंग विद द कपूर्स'ची चर्चा पण शोमधून आलिया भट्ट गायब; राज कपूर यांच्या नातवाने सांगितलं कारण

Nitish Kumar oath ceremony : नितीशकुमार आज बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची दहाव्यांदा शपथ घेणार, मोदींची 'ग्रँड एन्ट्री' होणार!

दुर्दैवी घटना ! 'काशीळमधील अपघातात ट्रकचालक ठार'; राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत रास्ता रोको, चाकच अंगावरून गेलं अन्..

Face Yoga Exercises: हिवाळ्यात चमकदार त्वचा हवी? मग रोज 'फेस योगा' करा!

SCROLL FOR NEXT