women helpline 
जळगाव

महिलांनो अडचणीत असाल तर उचला फोन; चोवीस तास हेल्‍पलाईन

सकाळवृत्तसेवा

जळगाव : जिंदगी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांची जळगाव दौऱ्यात भेट घेतली. या वेळी फाउंडेशनने महिलांसाठी सुरू केलेल्या ‘हेल्पलाइन’ उपक्रमाच्या फलकाचे अनावरण श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते झाले. महिलांना कुणीही मानसिक किंवा शारीरिक त्रास देत असल्यास, तसेच आत्महत्येचा विचार आल्यास त्या जिंदगी फाउंडेशनच्या हेल्पलाइन क्रमांकावर २४ तास कधीही संपर्क साधू शकतात. 

शाळा आणि महाविद्यालयाच्या किशोरवयीन मुला-मुलींसाठी सक्तीचे लैंगिक शिक्षण राज्य सरकारने सुरू करावे, या आशयाचे निवेदनही जिंदगी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीमती ठाकूर यांना दिले. जिंदगी फाउंडेशन दोन वर्षांपासून शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती आणि समुपदेशन करीत असलेल्या कार्याची श्रीमती ठाकूर यांनी माहिती घेतली. 
या वेळी ‘महिला सुरक्षितता’ याविषयावर जिंदगी फाउंडेशनने तयार केलेले पोस्टर श्रीमती ठाकूर यांना भेट देण्यात आले. या कार्यक्रमाला फाउंडेशनच्या अध्यक्षा सुश्मिता भालेराव, सचिव अजय पाटील तसेच सदस्या निशिगंधा भालेराव उपस्थित होत्या. 

...या क्रमांकावर साधा संपर्क 
महिलांना कोणीही मानसिक किंवा शारीरिक त्रास देत असल्यास किंवा आत्महत्येचा विचार आल्यास ९५४५२८१०६८ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. संबंधित तक्रारीची तत्काळ दखल घेतली जाईल, असे आवाहन फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Drought Tour : दुष्काळावर सरकारचा ॲक्शन प्लॅन; मुख्यमंत्र्यांची लातुरात कर्जमाफी, पाणी आणि मदतीबाबत मोठी घोषणा !

LPG Gas Cylinder E-KYC: गॅस सिलिंडरची e-KYC केली का? 1 ऑक्टोबरपासून बदलणार नियम; जाणून घ्या सोपी स्टेप-बाय-स्टेप माहिती

Nilanga Drought Crisis : आता जगायचं कसं ? मुख्यमंत्र्यांच्या समोर शेतकऱ्यांनी फोडला टाहो, CM फडणवीसांनी केलं असं काही..

Marathi News Live Updates : मतांची चोरी हा भारतीय जनतेविरुद्धचा गुन्हा आणि संविधानावरील थेट हल्ला : राहुल गांधी

Shrivardhan Fishermen Crisis : खराब हवामानाचा मच्छीमारांना फटका श्रीवर्धन तालुक्यातील वल्हावरच्या लहान होड्या अद्यापही किनाऱ्यावर

SCROLL FOR NEXT