जळगाव

शॉर्टसर्किटमूळे लागली आग..आणि पती-पत्नीचा साखर झोपत मृत्यू

मुलगी, मुलगा जुन्या घरात झोपले असल्याने त्यांचे प्राण सुदैवाने वाचले

सकाळ वृत्तसेवा

जामनेर : गारखेडा बुद्रुक (ता. जामनेर) येथील एका घराला (hoom) मंगळवारी (ता. ११) पहाटे साडेतीनच्या सुमारास भीषण आग (fire)लागली. या आगीत साखरझोपेत असलेल्या पती-पत्नीचा (Husband-wife) होरपळून संशयास्पद मृत्यू (Burning death) झाला. या हृदयद्रावक दुर्घटनेमुळे गारखेडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. उत्तम श्रावण चौधरी (वय ४५) व वैशाली उत्तम चौधरी (वय ४०) असे मृत दाम्पत्याची नावे आहेत. ( wire short circuit fire house husband wife died )

चौधरी दाम्पत्य घरात झोपलेले असताना अचानक शॉर्टसर्किट झाल्याचे व त्यामुळे घराला भीषण आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. ही आग हळूहळू सर्व घरात पसरली अन् संसारोपयोगी वस्तूंसह संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. उत्तम चौधरी यांचे गावातीलच जुने घर पडक्या स्थितीत असल्याने भाडे तत्वावर घेतलेल्या खोलीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात हे दाम्पत्य व त्यांचा मुलगा राहात होते. धूर व आग लागल्याचे बघून शेजाऱ्यांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. एकीकडे आग विझविण्याचा व दुसरीकडे दरवाजा उघडण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. मात्र, आतून बंद असल्याने घरात प्रवेश करण्यास मोठी अडचण निर्माण झाली होती. अखेर ग्रामस्थांनी दरवाजा तोडला असता समोरील वेदनादायी चित्र पाहून सर्वांचेच मन हेलावले. चौधरी यांना एक मुलगी व एक मुलगा आहे. ते जुन्या घरात झोपले असल्याने त्यांचे प्राण सुदैवाने वाचले.

दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यात पोलिस निरीक्षक प्रतापराव इंगळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश काळे, विलास चव्हाण, तुषार पाटील, हंसराज वाघ, सरपंच अशोक पाटील, तलाठी मीनाक्षी पंढागळे व ग्रामसेवक यांनी पंचनामा केला. या प्रकरणी सध्या तरी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस कर्मचारी विलास चव्हाण तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "देश ज्ञानेश कुमारांच्या बापाचा आहे का?" उद्धव ठाकरे कडाडले; केंद्र सरकारवरही बोचरी टीका

Maharashtra MLC Election 2026 : भाजपची मोठी घोषणा! विधान परिषद निवडणुकीसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचे उमेदवार जाहीर; पाहा संपूर्ण यादी

Raj Thackeray : लोकसभेनंतर 6 महिन्यांत 40 ते 60 लाख मतदार कसे वाढले? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; महाराष्ट्रातील 'एसआयआर' रद्द करण्यावरही भाष्य

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रातील एसआयआर पूर्णपणे रद्द करावा आणि यापुढे मतदान बॅलेट पेपरवर घ्या - मनसे अध्यक्ष राज ठाकरे

Masarul Dam Water: अवैध उपशामुळे धरणाच्या पाणीसाठ्यावर संकट;मासरूळ धरणातील उपशावर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT