जळगाव

विज वाहिनीचा धक्का बसला...  अन् तो २० फुटांवरून खाली कोसळला !

शंकर भामरे

पहूर , ता. जामनेर :  जळगाव -औरंगाबाद महामार्गावरील विद्युत वाहिनीचे काम सुरू असताना विजेचा धक्का लागून कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना आज सोमवारी सायंकाळी ५. ३० वाजेच्या सुमारास पहूर येथे घडली .
याबाबत सविस्तर वृत्त असे की ,पहूर -कसबे येथील रहीवासी  अकिलखान शकीलखान पठाण  हा तरुण कंत्राटी पद्धतीवर रोजंदारीने विद्युत कंपनीच्या ठेकेदाराकडे कामास होता .जळगाव -औरंगाबाद महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे नवीन तारा ओढण्याचे काम सुरु आहे . अजिंठा पेट्रोल पंपाजवळ लोकमान्य टिळक नगर येथे जुन्या तारा काढून नवीन तारा ओढण्याचे काम सुरू असताना अकिलखान शकीलखान पठाण हा तरुण सिमेंटच्या विज खांबावर चढला . तो ज्या वीज खांबावर चढला होता , त्या खांबावरील  वीजपुरवठा बंद होता  .मात्र त्याच वाहिनीच्या जवळून ११ के . व्ही . क्षमतेच्या वीजवाहिनीतून वीज प्रवाह सुरू होता . कामाच्या ओघात अकील उभा राहताच त्याच्या डोक्याला  मुख्य विजवाहिनीचा स्पर्श झाल्याने त्यास विजेचा जोरदार धक्का बसला आणि सुमारे  २० फूटांवरून तो खाली कोसळला .   यात त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला .त्यास सोबतच्या  सहकाऱ्यांनी तत्काळ ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले . पहूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार असून या प्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू आहे .

दवाखान्यात वडिलांचा आक्रोश 

मुलाचा मृत्यू झाल्याची वार्ता समजतात वडील  ग्रामीण रुग्णालयात आले .अकिलचा मृतदेह पाहून त्यांनी एकच हंबरडा फोडला . आई -वडिलांनी हमाली तसेच दुसऱ्यांच्या शेतात मोल मजूरी करून लहानाचा मोठा केलेल्या मुलाच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे . मयत अकिलच्या मागे आई -वडील , लहान भाऊ  , २ बहीणी असा परिवार आहे .

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT