जळगाव

शंभर वर्षांची परंपरा, गुंजतोय हरिनामाचा गजर ! 

सुरेश सोनार

फत्तेपूर (ता. जामनेर)  : शंभर वर्षांपूर्वी तत्कालीन भजनी मंडळींनी सुरू केलेली परंपरा आजच्या पिढीनेही कायम ठेवली आहे. कोजागरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत एक महिना काकडा आरतीचा गजर असतो. हरिनामाने गाव दुमदुमून जाते. 


सर्व जण पहाटे साडेचारला श्रीराम मंदिरात जमतात. तेथून टाळ-मृदंगाच्या गजरात कांग नदीच्या पात्रात येतात. नदीला दीप अर्पण करून गंगावदनाचे अभंग गातात. तेथून पूर्ण गावाला प्रदक्षिणा घालतात. तुकाराम महाराज, नामदेव महाराज, संत जनाबाई, संत सेना न्हावी, संत नरहरी सोनार यांचे अभंग म्हटले जातात. संत परंपरेचे वासुदेव गायले जातात. नगरप्रदक्षिणेत विठ्ठल-रुखमाईची मूर्ती एकाच्या हातात असते. सवाष्ण महिला पूजा करतात. काकडा आरतीचा समारोप मारोतीच्या पारावर सकाळी सहाला होतो.

 
निवृत्ती करंकाळ, पंढरी इधाटे (विणेकरी), कृष्णा हिंगे (मृदंग), कमलेश चौधरी, प्रकाश इधाटे (देवधर), टाळकरी अशोक चौधरी, अशोक इधाटे, हिंगे बुवा, माणिक चौधरी, प्रकाश बरकले, सुरेश सोनार, प्रकाश महाजन, अशोक हुंबड, समाधान हुंबड, प्रल्हाद शेळके, विनोद चौधरी, पंडित चौधरी, श्यामकांत कुलकर्णी, प्रभाकर धांडे, पंढरी शिंदे, ज्ञानेश्वर धोबी, प्रवीण चौधरी, प्रकाश चोपडे, शुभम बळोकर, यश चौधरी यांच्यासह आबालवृद्ध सहभागी होतात.  

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'T20 वर्ल्ड कपमधून डच्चू मिळाला, आता शुभमन गिल... ', पुजाराचे IPL 2026 साठी गुजरात टायटन्सबाबत मोठं भाकीत

Broiler Chicken : बॉयलर जिवंत कोंबड्यांना उच्चांकी दर; चिकनच्या दरात मोठी वाढ

Manchar News : कलमोडी प्रकल्पाच्या पाणी फेरनियोजनास राज्य शासनाची मान्यता; आंबेगाव व खेड तालुक्यातील ६,६२२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

MSRTC : गारगोटी आगाराची १८ लाख कमाई; आदमापूर यात्रेसाठी सहा दिवसांत साडेपाचशे जादा फेऱ्या

Water Plant Negligence : अन्यथा कळंबा फिल्टर हाउसच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावू; नगरसेवकांचा इशारा, ‘बी वॉर्ड’ चे दुरवस्थेवर बोट

SCROLL FOR NEXT