sucide
sucide 
जळगाव

"गोइंग टू द लॉन्ग जर्नी' स्टेटस्‌ ठेवले अन्‌ अवघ्या काही मिनिटातच... 

शंकर भामेरे

पहूर (ता. जामनेर) : जामनेर तालुक्‍यातील पहूरपेठ येथे शासकीय विश्रामगृहच्या बाजूला राहणाऱ्या वीस वर्षीय तरुणाने राहत्या घरातच छताला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. 
पहूर पेठ येथील शेतकरी समाधान रामकृष्ण चौधरी यांचा मुलगा राहुल समाधान चौधरी (वय 20) हा वाणिज्य शाखेत पदवीचे शिक्षण घेत होता. शिक्षणासोबतच आई- वडिलांना शेती कामातही मदत करायचा. भारतीय सैन्य दलात जाण्याची त्याची तीव्र इच्छा होती. त्यासाठी आवश्‍यक असलेली तयारीही त्याची सुरू होती. आज नेहमीप्रमाणे सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारासही तो रनिंगसाठी गेला असल्याचे मित्रांनी सांगितले. 

व्हाट्‌स ऍपवर ठेवले स्टेटस्‌ अन्‌ 
गुरुवारी सकाळी सातला राहुलने 'गोइंग टू द लॉन्ग जर्नी' असे व्हाट्‌सऍपवर स्टेटस ठेवले. आई- वडील शेतात गेल्यानंतर त्याने घरातील मागच्या खोलीत पंख्याजवळील लोखंडी आड्याला दोरखंडाचा गळफास लावून त्याने जीवन यात्रा संपवली. 

आईने फोडला हंबरडा... 
घटनेची माहिती मिळताच आई- वडील शेतातून घरी आले. पोटच्या मुलाचा मृतदेह पाहताच त्यांनी हंबरडा फोडला. मित्र परिवारात मिळून मिसळून राहणाऱ्या राहुलने केलेल्या आत्महत्येनंतर साऱ्यांना धक्‍काच बसला. पहूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार असून प्रकाश शेनफडू पांढरे यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्‍चात आई- वडील लहान भाऊ, आजी असा परिवार आहे. 

आत्महत्या पर्याय नव्हे 
टेंशन, समस्या, संकट अथवा नैराश्‍य कोणतेही असु द्या त्यामुळे आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय कोणीही घेऊ नये. समस्या असली तर त्यावर उपाय सुद्धा नक्कीच असतो. त्यामुळे आपल्यावर आलेले संकट कोणतीही समस्या कुटुंबातील मोठ्यांशी व मित्रांशी मन मोकळेपणाने व्यक्त करा. थेट टोकाचा निर्णय घेऊन आत्महत्येसारखा पर्याय निवडणे चुकीचे असल्याचे बोलले जात आहे. 

संपादन : राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT