जळगाव

गावातील पाणी टंचाई दुर करण्यासाठी अनधिकृत नळ कनेक्शनवर कारवाई 

सचिन महाजन

जामठी  (ता. बोदवड) : जामठी येथे गावाला ओडीए योजनेतंर्गत आठ ते दहा दिवसांआड पाणी पुरवठा होतो मात्र ऐन उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाई भासू नये म्हणून ग्रामपंचायत प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. याव्यतिरिक्त टिपीडब्लुएस योजनेअंतर्गत 2006 साली गावातीलच हरीभाऊ सोळंखे यांच्या शेतात एका बोअरवेलची निर्मिती केली आहे मात्र तिच्यावर निम्म्या गावाचीच तहान भागत होती. मात्र नवनियुक्त सरपंच पदाधिकाऱ्यांनी बोअरवेलला सुमारे साडे पाचशे फुट खोल करून जलसाठा वाढविला आहे.याच बोअरवेलचे पाणी गावात टप्प्या टप्प्याने सोडून ग्रामस्थांची तहान भागवण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत करीत असली तरी याला काही नागरिक अनधिकृत नळकनेक्शन घेउन अपवाद ठरत आहे.

जामठीतील प्रभाग क्रं तीन मध्ये अनधिकृत नळ कनेक्शनला भरपुर पाणी मिळत असुन अधिकृत नळ कनेक्शन ला पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यां समोर विषय मांडला त्यावर सरपंच रेखाताई पाटील व सदस्यांनी तात्काळ दखल घेत अनधिकृत नळकनेक्शन धारकांचे पितळ उघडे पाडले. कर्मचाऱ्यांनी अवैध नळकनेक्शन पाहण्यासाठी खोदकाम केले असता एका पाईपलाईन वर एका व्यक्ती ने तीन ते चार अवैध कनेक्शन दिसताच ग्रामपंचायत प्रशासन ही अवाक झाले.असे गावात अनेक अवैध नळकनेक्शन असून ते ग्रामपंचायतीचा लाखोंचा कर बुडवित असुन त्यांच्यावर कारवाई होणार आहे.त्यामुळे अवैध नळकनेक्शन धारकांचे धाबे दणाणले आहे.यावेळी ग्रामपंचायत सरपंच रेखाताई पाटील,उपसरपंच शेख मुनाफ शेख न्याजमहमद,राजेंद्र जैस्वाल,अमोल गायकवाड, अशोक माळकर,मीराबाई बोरसे,ग्रामपंचायत कर्मचारी भागवत पाटील ,पवन कोलते,विशाल ठाकुर आदी उपस्थित होते.

अवैध नळकनेक्शन धारकांवर कारवाई अटळ
जामठी गावात दिवसेंदिवस पाण्याची समस्या गंभीर बनत असून ग्रामपंचायत प्रशासन पाणीटंचाई दुर करण्यासाठी प्रयत्न करीत असले तरी त्याला काही नागरिक अपवाद ठरीत आहे.काहींनी आपल्या स्वत:च हातांनी अवैध नळकनेक्शन घेतले असुन ग्रामपंचायतीने अवैध नळकनेक्शन धारकांची शोधमोहीम सुरू केली असुन कारवाईचा एल्गार पुकारला आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI New Rule: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी अलर्ट! 10,000 रुपयांपेक्षा जास्त पैशाच्या ट्रान्सफरवर RBI नवीन नियम लावणार

नवरा, बायको आणि मित्र… तिघेही दिव्यांग; पण एका रात्रीत घडली पतीच्या हत्येची थरारक घटना, मारेकरी कोण? संवाद नसताना तपास कसा झाला?

‘तिघी’ची आंतरराष्ट्रीय झेप! न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये क्लोजिंग फिल्म म्हणून निवड

कपडे शिवून घेण्यासाठी दुकानात गेली; ब्लाऊजचं माप घेत असताना तरुणीसोबत नको ते घडलं...

Fertilizer Price Hike : बळीराजाला खत दरवाढीचा झटका; केंद्र सरकारकडून अनुदानात वाढ, तरीही कंपन्यांकडून रासायनिक खताची दरवाढ

SCROLL FOR NEXT