जळगाव

जंगली प्राण्यांनी भऊर शिवारात मका पिकांचे केले नुकसान 

दिपक कच्छवा

मेहुणबारे ः भऊर (ता.चाळीसगाव) येथील शिवारात रानडुकारांचा गेल्या काही दिवसापासून हैदोस सुरु आहे. भऊर येथील शेतकरी दीपक अंकुश पाटील यांच्या एका महीन्यात काढणीवर आलेल्या दोन एकर मका क्षेत्रातील एक एकरवरील मका पिकाचे रानडुकरांनी  नुकसान केले. त्यामुळे या शेतकऱ्यांंला मोठा फटका बसला आहे. या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी व रानडुकारांचा बंदोबस्त करावा अशी मागणी दीपक पाटील यांनी वन विभागाकडे केली आहे.
  
गत वर्षी अति पावसामुळे खरीप हंगाम हाताचा गेला होता. त्यामुळे यंदा भऊर (ता.चाळीसगाव) शिवारात शेतकऱ्यांची रब्बीवरच मदार आहे. चांगल्या पावसामुळे सध्या रब्बीचे पिके बहरात असतांनाच गेल्या काही दिवसापासून परीसरात रानडुकरांनी मोठा हैदोस घातला आहे. या रानडुकरांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांना रात्रंदिवस शेतात पिकांचे रक्षण करण्याची वेळ आली आहे. भऊर शिवारात दीपक पाटील यांच्या गट नं.7मध्ये मक्याची लागवड केली आहे. सध्या हा मका ऐन बहरात असतांना रविवारी रात्री रानडुकरांनी सुमारे एक एकरवरील मका पिकांची नासधूस केली. त्यामुळे या शेतकऱ्याला लाखो रुपयाचा फटका बसला आहे.
    
या झालेल्या नुकसानीचा वन विभागाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी दीपक पाटील यांनी वन विभागाकडे केली आहे.दरम्यान यापूर्वी रान डुकरांनी काही शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. या रानडुकरांकडून शेतकऱ्यांच्या जीवीतासही धोका निर्माण झाला आहे.सतत पिकांचे नुकसान करणाऱ्या रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून वारंवार होवून देखील वनविभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० फेऱ्या, १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांत रूपांतर

FDA Crime : पुणे शहरातील प्रसिद्ध गोल्‍डन बेकरीसह दहा बेकरी, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; अस्वच्छतेप्रकरणी एफडीएची कारवाई

Garfield Sobers: क्रिकेटच्या इतिहासातील महान ऑलराउंडर काळाच्या पडद्याआड! गॅरी सोबर्स यांचं निधन; क्रीडाजगत शोकसागरात

Pune News : जप्त गुळाचे करायचे काय? गूळ उत्पादकांचा सवाल, जवळपास ४०० गुऱ्हाळांवर परिणाम

Amritsar Express: अमृतसर एक्स्प्रेसच्या डब्याखाली सापडला मानवी पाय; सीएसएमटी रेल्वे यार्डमधील घटना, रेल्वे पोलिसांना वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT