जळगाव

शेतकऱ्यांनी केली तक्रार...आमदार धडकले कृषी केंद्रात आणि घेतली झाडाडती ! 

सकाळवृत्तसेवा

मुक्ताईनगर  : तालुक्यातील शेतकऱ्यांनी शहरात कृषी दुकानांवर रासायनिक खते मिळत नसून काळ्या बाजारात जादा भावाने विक्री होत असल्याची तक्रार आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. याची दखल घेत कृषी अधिकाऱ्यांसह त्यांनी कृषी केंद्रांची झाडाझडती घेतली. यात खतांचा काळा बाजार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच उगम प्रमाणपत्रे (प्रिन्सिपल) नसलेले खतांचा अवैध साठा आढळून आलेला आहे. 

तालुक्यातील खामखेडा, हरताळे, रुईखेडा, चांगदेव येथील शेतकऱ्यांनी आमदारांकडे केलेल्या तक्रारीवरून आमदार पाटील यांनी स्वतः शेतकऱ्यांसोबत एका दुकानात जाऊन त्या दुकानांवर 10:26:26 व युरियाची मागणी केली. दुकानदार सुधीर झांबरे यांनी ही रासायनिक खते नसल्याचे सांगितले. आमदार पाटील यांना संशय आल्याने त्यांनी संबंधित दुकानाच्या गोदामाची तपासणी करण्याचे आदेश तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांना दिले. जळगाव येथील कृषी विभागाचे जिल्हा नियंत्रण अधिकारी अरुण तायडे यांना मुक्ताईनगर येथे बोलावून घेतले. दोघे अधिकाऱ्यांसह आमदारांचे स्वीय सहायक प्रवीण चौधरी, पंचायत समितीचे माजी उपसभापती अनंतराव देशमुख यांचे उपस्थितीत तपासणी केली. एका ठिकाणी अधिकाऱ्यांना रासायनिक खते आढळून आली. यानंतर आमदारांनी कृषी अधिकाऱ्यांसह अनेक कृषी केंद्राची पाहणी केली. शहरातील एका दुकानदाराची मालवाहू गाडी क्रप्रवर्तन चौकात संशयास्पद रित्या उभी करण्यात आली होती. यातील माल लपविण्याचा प्रकार होत असल्याची माहिती कृषी अधिकारी यांना मिळताच कृषी अधिकारी आपल्या पथकासह त्या ठिकाणी पोहोचले. ते वाहन संबंधित दुकानासमोर आणले. यामध्ये काहीतरी गौडबंगाल असल्याची माहिती समोर येत असून रात्री उशीपर्यंत तपासनी सुरू होती. 


कारवाई करू ः कृषी अधिकारी व्यवहारे 
संबंधित दुकानात रासायनिक खत विक्रीचे उगम प्रमाणपत्रे (प्रिन्सिपल सर्टिफिकेट) नसलेल्या मालाचा साठा आढळून आलेला आहे. शेतकऱ्यांना 10:26:26 व युरिया हा माल नसल्याचे सांगितले. गोदाम तपासणीत रासायनिक खते आढळून आले आहे. चौकशीअंती यामध्ये अजून सत्य बाहेर येणार असून पुढील कारवाई करण्यात येईल, असे तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांनी सांगितले . 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virtual Campaign: अटक केलेल्या राजकीय नेत्यांना व्हर्च्युअल प्रचाराची परवनगी मागणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली

Goldy Brar Death: सिद्धू मूसवाला हत्याकांडाच्या मास्टरमाईंडची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या

Bumble : आता 'लेडीज फर्स्ट' नाही, तर पुरूषांनाही मिळणार समान संधी.. बम्बल डेटिंग अ‍ॅपने केली मोठी घोषणा!

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

SCROLL FOR NEXT