Accident 
जळगाव

नंदुरबारः जेवणासाठी जाणे पडले महागात..ट्रकच्या धडकेत दोघे ठार

दोघेही दुचाकीवर रात्री जेवणासाठी जात असताना अचानक समोरून येणारे माल ट्रकने समोरून धडक दिली.

दिलीप गावीत


विसरवाडी ः राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर गंगापूर (ता. नवापूर) जवळ रस्त्याच्या वळणाला मालट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक (Accident) दिली त्‍यात एक जागीच ठार झाला. तर दुसऱ्याचा उपचारादरम्‍यान मृत्यू (Death) झाल्याची घटना मंगळवार रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.


गंगापूर (ता. नवापूर) गावाजवळ वळणावर धुळेकडून सुरतकडे मालट्रक (एम एच४१, एजी८०२८) भरधाव वेगाने जात असताना, चिंचपाडाकडून विसरवाडीकडे दोघे दुचाकीस्‍वार (एमएच ३९ के ६९८४) मिठूराम भागुराम वर्मा (वय ३५ रा. गिरावडी ता. उदयपुर वाटी राजस्थान) व हल्ली मुक्काम मराठी शाळा बाजार पेठ चिंचपाडा हा जागीच ठार झाला. तर मंगलदास रोहिदास वसावे (वय.२६, रा. चिंचपाडा ता.नवापुर) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोघेही दुचाकीवर रात्री जेवणासाठी जात असताना अचानक समोरून येणारे माल ट्रकने समोरून धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला. या प्रकरणी हरिराम नथुराम वर्मा (वय. ३२, रा. गिरावडी ता. उदेपुर वाटी जि. जुजनू (राजस्थान) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चालकाविरोधात विसरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पाटील त्वरित अपघातस्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT