जळगाव

अवैध वाळू उपसाने गावकरी वैतागले; आणि 'गिरणा बचाव' साठी सरसावली तरुणाई !

चंद्रकांत चौधरी

पाचोरा  : कुरंगी (ता पाचोरा) शिवारातील गिरणा नदीपात्रातून होणारा वाळूचा उपसा व वाहतूक कमालीची वाढली असून महसूल विभाग कोरोनाच्या विळख्यात अडकल्याने सारे काही सुसाट झाले आहे' हे थांबवण्यासाठी कुरंगी येथील तरुणाई सरसावली असून त्यांनी गिरणा बचाव मोहीम हाती घेतली आहे.

पाचोरा उपविभागाचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे ,नायब तहसीलदार संभाजी पाटील, तलाठी मयूर आगरकर यांना गेल्या आठवड्यापासून कोरोनाची लागण झाल्याने व त्यांच्या संपर्कात आलेले बहुतांश कर्मचारी कॉरंटाईन झाल्याने महसूल विभागाचे कामकाज कमालीचे थंडावले आहे. दुसरीकडे सरपंच कालखंड संपल्याने ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे .एका प्रशासकाकडे दोन ते तीन गावे असल्याने व ग्रामपंचायत कारभाराचा अनेकांना अनुभव नसल्याने कठोर कारवाईची अपेक्षा व चित्र नाही. त्यामुळे वाळू उपसा व वाहतूक कमालीची वाढून गिरणा नदी पात्रा लगतच्या गावातील ग्रामस्थ अक्षरशः वैतागले आहेत .गिरणा नदी पात्रालगत असलेल्या कुरंगी ( ता पाचोरा ) येथून होणारी वाळू वाहतूक सर्वश्रुत आहे .या संदर्भात अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील दखल घेऊन लहान मोठ्या कारवाया केलेल्या आहेत. परंतु आता महसूल विभाग कोरोनाच्या विळख्यात अडकल्याने वाळू उपसा व वाहतूक शिगेला पोहोचली आहे. हा सारा खेळ रात्रीच्या सुमारास प्रचंड वाढला असल्याने तो ग्रामस्थांसाठी जीवघेणा ठरत असल्याचा संतप्त सुर व्यक्त होत आहे.


कुरंगी येथील तरुणाई संतप्त झाली आहे .कुरंगी येथील सुदाम ठाकरे, सुरेश कोळी, दीपक मोरे ,गजानन पवार ,रामचंद्र धनगर, सुनील पाटील, नामदेव पाटील ,योगेश ठाकरे, ज्ञानेश्वर पाटील, पांडुरंग भोई, आबा भोई, श्याम पाटील, अजय जयस्वाल, विजय पाटील या तरुणांनी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन गिरणा बचाव मोहीम हाती घेतली आहे. गिरणा नदी पात्रातील वाळू ग्रामपंचायतीची नसून ती माझी आहे आहे या विचाराने प्रेरित होऊन गिरणा मातेचे संरक्षण ही माझी जबाबदारी असा संकल्प या तरुणाईने केला आहे.
गिरणा नदी पात्रातील वाळू उपसा व त्याची वाहतूक या गोष्टींना लगाम घालण्यासाठी ही तरुणाई एकवटली असून ग्राम दक्षता समितीची स्थापना तसेच रात्रीच्या गस्तीसाठी भरारी पथके तयार करून या तरुणांनी खडा पहारा देणे सुरू केले आहे. त्यामुळे वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांची गोची झाली असून या प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन गिरणा बचाव मोहिमेसाठी सरसावलेल्या तरुणाईला योग्य ती मदत व सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Air Connectivity : कोल्हापुरातून मुंबई, अहमदाबाद व बंगळूरसाठी नवीन, सुधारित विमानसेवा सुरू; सोयीस्कर प्रवास होणार

Chhatrapati Sambhajinagar: रॉकेल मिळणार; पण ‘स्टोव्ह’ कुठून आणणार?; अनेक कुटुंबांचा प्रश्न ः एकच सिलिंडर असलेल्या गृहिणींपुढे अडचणींचा भडका

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगर ‘ईव्ही हब’ बनणार; अतुल सावे : मराठवाड्याच्या विकासावर परिषदेत मंथन

IPL 2026: RCB घरच्या मैदानात SRH ला भिडणार, पण पहिल्याच सामन्याला हुकमी एक्के मुकणार; जाणून घ्या संभावित Playing XI

Latest Marathi News Live Update : रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार

SCROLL FOR NEXT