heavy rain 
जळगाव

नागरीकांची फिरस्‍ती थांबेना; मग प्रशासन नव्हे तर यामुळे झाला लॉकडाउन

सी. एन. चौधरी

पाचोरा : शहर व परिसरात रविवारी (१३ सप्टेंबर) रात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून, शहराशी जोडलेले सर्व रस्ते पाणी साचल्याने बंद झाले. त्यामुळे शहराशी असलेला संपर्क तुटला. यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागला. पालिकेने यासंदर्भात तातडीने कोणतेही नियोजन केलेले नाही. त्यामुळे ‘पालिका सुस्त अन् नागरिक त्रस्त’ची अनुभूती आली. 

सर्वत्र दमदार पाऊस झाल्याने खडकदेवळा (ता. पाचोरा) येथील हिवरा धरण ओसंडले. त्यामुळे हिवरा नदीला पूर येऊन कृष्णापुरी भागाकडून शहराला जोडणाऱ्या हिवरा नदीवरील पुलाच्या कठड्यावरून पाणी वाहू लागले. अनेक वर्षांनंतर प्रथमच हा पूल पाण्याखाली गेला. पूर पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली, तसेच पावसामुळे बसस्थानकाकडे जाणाऱ्या शिवाजीनगरातील नाल्यालादेखील प्रचंड पाणी आल्याने यामार्गे शहरात जाणारी वाहतूक थांबली. भडगाव रोड भागातील राजे संभाजी रेल्वे भुयारी मार्गात सुमारे चार ते पाच फुटांपर्यंत पाणी साचले. त्यामुळे या भागाकडून शहरात जाणारा रस्ता बंद होऊन शहराशी असलेला संपर्क तुटला. 

पोलिकेच्या कारभारावर कमेंट
एकीकडे कोरोनामुळे नागरिक हवालदिल झालेले असताना व बहुतांश रुग्ण रुग्णालयांत दाखल झालेले असताना शहराला जोडणाऱ्या कृष्णापुरी, शिवाजीनगर व भडगाव रोड भागातील रस्ते पाणी साचल्यामुळे बंद पडली. परिणामी बहुतांश जणांना त्रास व मनस्ताप सोसावा लागला. भुयारी मार्गातील वीजपंप बंद पडल्यामुळे तेथील पाण्याचा उपसा करता आला नाही. त्यामुळे पाणी साचले. अनेकांनी या भुयारी मार्गातून जीवघेणी कसरत करीत मार्ग काढला. सोशल मीडियावर याबाबत पालिकेच्या विरोधात विविधांगी ‘कमेंट’ करण्यात आल्या. असे असले तरी पालिकेने परिस्थितीचे गांभीर्य विचारात घेऊन त्वरित पाण्याचा निचरा करण्यासंदर्भात नियोजन केले नाही. त्यामुळे नागरिकांनी संतप्त भावनांना वाट मोकळी करून दिली. दुपारी बारापर्यंत भुयारी मार्गातील पाणी ‘जैसे थे’ असल्याने अनेकांची कामे खोळंबली व कर्मचाऱ्यांनाही कार्यालयात जाता आले नाही. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजार हिरव्या रंगात बंद! सकाळच्या तेजीला दुपारी ब्रेक; कारण काय? कोणते शेअर्स वाढले?

T20 World Cup : इंग्लंडच्या विजयाने India vs Pakistan सामन्याच्या आशा मावळल्या! उपांत्य फेरीत दोन्ही संघ समोरासमोर नाही येऊ शकणार

मी खचले होते... 'कमळी' मधील अन्नपूर्णा आजींवर एका कारणामुळे झालेली टीका; म्हणाल्या, 'माझ्यात कमी...'

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या वणीत आलिशान दुमजली घरात बनावटी दारू कारखाना,राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड

"तिचं कौतुक पण ट्रोलर्सच्या कमेंट्स.." नॅशनल क्रश गिरीजाचे वडील नेटिझन्सवर संतापले; म्हणाले..

SCROLL FOR NEXT