जळगाव

पाऊस नाही, पाणी नाही तरी भुयारी मार्गाचा कसा काय झाला तलाव 

चंद्रकांत चौधरी


पाचोरा  : येथील राजे संभाजी रेल्वे भुयारी मार्गात आज सकाळी सुमारे एक ते दीड फूट पाणी साचून भुयारी मार्गाचा अक्षरश: तलाव झाल्याने नागरिकांना मनस्ताप सोसावा लागला. पाऊस नसताना भुयारी मार्गात एवढे पाणी आले कोठून, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा पालिकेसह नागरिक प्रयत्न करीत आहेत. 


राजे संभाजी रेल्वे भुयारी मार्ग जुन्या व नव्या शहराला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचते; परंतु येथे असलेल्या वॉटर लिफ्टिंग यंत्रणेमार्फत या पाण्याचा निचरा केला जातो. गेल्या तीन-चार दिवसांपासून शहरात पाऊस नसताना आज सकाळी भुयारी मार्गात प्रचंड पाणी आले व तलाव साचला. वॉटर लिफ्टिंग यंत्रणा बंद असल्याने हे पाणी बराच वेळ साचून होते. शनिवारी बाजाराचा दिवस असल्याने भुयारी मार्गातून ये-जा करणाऱ्यांची प्रचंड गर्दी होती. त्यामुळे येथून ये-जा करताना नागरिक व वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागला.

पाणी आले कसे ?

बऱ्याच दुचाकी घसरल्याने काहींना किरकोळ इजा झाली. पाऊस नसताना भुयारी मार्गात पाणी आले कसे, की परिसरातील सांडपाणी येथील पाइपमधून आले, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न नागरिक करीत आहेत. हे जर सांडपाणी असेल तर शेकडो नागरिकांना मल- मूत्राचे पाणी अंगावर घेण्याचा कटू प्रसंग अनुभवायला मिळाला, असाही सूर व्यक्त होत आहे.  

जळगाव

संपादन- भूषण श्रीखंडे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR Form असा भरा; आज शेवटची संधी! मोबाईलवरून 5 मिनिटांत ऑनलाइन अर्ज, Step-by-Step जाणून घ्या

Swarna River: नदीचा प्रवाह वाढला, परतीचा मार्ग बंद; ६ किमी पायी चालत SDRFने ६ विद्यार्थ्यांना वाचवले! थरारक Video Viral

IND vs SL 1st Test: वाचवलंस मित्रा! KL Rahul ने धरलेली तंबूची वाट, पण देवदत्त पडिक्कने रोखले... पुढे काय घडले? Viral Video

शिंदेंच्या कार्यक्रमात भलताच प्रकार, लावायचं होत वंदे मातरम लागलं बॉलिवूडचं गाणं, पुढे काय झालं पहाच; Video Viral

Marathi News Updates : कोलकाता येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला आग

SCROLL FOR NEXT