जळगाव

एकही प्रवासी नाही... तरी  बस धावल्या रिकाम्या 

सकाळवृत्तसेवा

पारोळा :  लॉकडाऊनमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसही थांबल्या होत्या. आता थोडी शिथिलता आल्याने अनेक भागात बस सुरू करण्यात आल्या आहेत. येथील आगारातूनही बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र, एकही प्रवासी नसल्याने बस रिकाम्या धावल्या. आगाराचा डिझेलचा खर्च वाया गेला असून, मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. 

कोरोनाच्या गेल्या २३ मार्चपासुन बस बंद करण्याच्या निर्णय शासनाने घेतला होता. मात्र, त्यानंतर आता अनलॉक- १मध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून बस सेवा सुरु करण्याच्या निर्णय शासनाने घेतला. या पार्श्वभूमीवर अमळनेर ते कोळगाव, पारोळा ते कासोदा व पारोळा ते अमळनेर अश्या अकरा फेऱ्या पारोळा स्थानकापर्यंत मारण्यात आल्या. या फेऱ्यांमध्ये एकही प्रवासी नसल्याने बस रिकाम्या गेल्या. पारोळा आगारास शून्य उत्पन्न असल्याची माहीती पारोळा स्थानकप्रमुख बी. एन. वाघ यांनी दिली. जिल्हांतर्गत पहील्या दिवशी अमळनेर आगारातून अमळनेर- पारोळामागे चाळीसगाव बस सोडण्यात आली. मात्र या बसमध्ये पारोळ्यातुन वाहक व चालकाशिवाय कुणीच प्रवाशी नव्हता. कोळगावपासून बस माघारी फिरकली. दोन ते तीन दिवसात प्रवासीच मिळत नसल्याने अखेर बसची चाके पुन्हा थांबली आहे. बस रिकाम्या गेल्याने डिझेल व त्याच्या नियोजनाचा खर्च आगारास उचलावा लागत आहे. 

बसमधून सुरक्षिततेची हमी 
कोरोनामुळे प्रवासी खासगी वाहनांसह बसमधूनही प्रवास करणे टाळताना दिसुन येत आहेत. स्वतःच्या खासगी वाहनातुन नागरिकांचा प्रवास वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र, खासगी वाहनातुन सुरक्षितेची हमी कुणीही देत नाही. बसमधील प्रवास हा सुरक्षित मानला जातो. त्यामुळे नागरिकांची मानसिकता बदलविण्याची गरज आहे. शासन ज्या प्रमाणे प्रत्येक लॉकडाऊनमध्ये आर्थिक घडी बसविण्यासाठी सर्वागीण प्रयत्न करित आहे. त्याचप्रमाणे सर्वसामान्याची संजीवनी ठरणारी बसचाही विचार होणे काळाची गरज ठरली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT