crime 
जळगाव

पारोळाः अखेर पीम किसान गैरव्यवहारप्रकरणी सहा जणांवर गुन्हा

एम. किसान योजनेत गैरमार्गाने संबंधित व्यक्तीस शेतकरी दाखवून योजनेचा लाभ मिळवून दिला.

सकाळ वृत्तसेवा


पारोळा : स्वतःच्या नावावर एक गुंठाही जमीन नसलेल्या अनेकांना शेतकरी (Farmer) दाखवून तालुक्यातून पीएम किसान योजनेचे (PM Kisan Yojana) ॲप्रोवल दिले, याचे पुरावे असताना, अनेक दिवसांपासून संबंधितांवर कोणतीही कारवाई होत नव्हती. याबाबत ‘सकाळ’ने वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यावरून पारोळा पोलिसांत (Parola Police) सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पी. एम. किसान गैरव्यवहारप्रकरणी तब्बल सहा जणांविरुद्ध गुन्हा झाला असून, या गैरव्यवहाराचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत, हे संशयितांकडून उघडकीस येणार आहे.


याबाबत तहसील कर्मचारी नईमोद्दीन मुजावर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की संशयित राहुल पाटील (रा. चोरवड), प्रशांत हाटकर (कामतवाडी), महेश खैरनार, देवीदास पाटील (दोघे मंगरूळ), संजय बाविस्कर (मोंढाळे प्र.उ.), सचिन पाटील ऊर्फ बाबाजी (शिरसमणी) यांनी आपले सरकार पोर्टलद्वारे अनधिकृतपणे लॉग इन आयडी व पासवर्डचा दुरूपयोग करून पी. एम. किसान योजनेत गैरमार्गाने संबंधित व्यक्तीस शेतकरी दाखवून योजनेचा लाभ मिळवून दिला. त्यावरून शासनाची फसवणूक केली. यावरून वरील संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.


दरम्यान, तालुक्यात या संशयितांनी किती लाभार्थ्यांना लाभ दिला आहे? त्यांना मंजुरी कोणी दिली? त्यांचे रजिस्ट्रेशन कोणी केले? यामागील मुख्य सूत्रधार कोण, असे अनेकविध प्रश्नांची उकल होणार आहे.


सर्वांत प्रथम ‘सकाळ’ने पी. एम. किसान सम्मान निधी योजनेतील गैरप्रकार उजेडात आणला. एक गुंठाही जमीन नसलेल्या भडगाव व पाचोरा तालुक्यातील अनेकांना पारोळा तालुक्यातील शेतकरी असल्याचे दाखवून त्यांचे पीएम किसान सम्मान निधी योजनेत गैरप्रकारे नोंदणी केली. याबाबत कोणतीही शहानिशा न करता संबंधित विभागाने मंजुरी दिली होती. याबाबत दीड महिन्यापासून ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध करून विभागाला जागे करण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT