goat weakly market 
जळगाव

गंभीर...हायवेवरच आल्‍या बकऱ्या

सकाळ वृत्तसेवा

पारोळा ः जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये कोणतेही धार्मिक सण, उत्सव तसेच पुढील आदेश येईपर्यत गुरांचा आठवडे बाजारास बंदी असतांना देखील आज शहरासह इतर ठिकाणाहून बकरी व्यावसायिकांनी आदेशाची पायमल्ली करित मार्केट कमेटी बंद असलेल्या गेट समोरच गुरांचा बाजारात थाटला होता.
कोरोनामुळे २३ मार्चपासुन लॉकडाउनमध्ये सर्व बंद होते. आता सर्वत्र अनलाँकची प्रकिया सुरु झाली असल्‍याने हळूहळू मार्केट परिस्‍थिती पुर्वपदावर येत आहे. मात्र गर्दीचे ठिकाणास व आठवडे बाजारास आज देखील बंदी कायम आहे. परंतु, पारोळा येथे आज रविवारचा आठवडे बाजारात बकरी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी एकच गर्दी करित महामार्ग जाम केला होता. यावेळी पोलिसांनाही व्यावसायिकांनी हुलकावणी दिली. दरम्यान बारा वाजेपर्यत बकरी व्यवसाय सुरु असल्याचे प्रत्यक्षदर्शी यांनी माहिती दिली.

बाजारास यात्रेचे स्वरुप 
गेल्या पाच महिन्यापासुन आठवडे बाजारास बंदी असल्याने गुरे खरेदी- विक्री बाजारास बंद होता. ऑनलाईन गुरे विक्री व्यवसायास परवानगी देण्यात आली आहे. मात्र आज बकरी व्यावसायिकांनी सर्वच नियम धाबेवर बसवित तोंडाला मास्क व सामाजिक अंतर विसरुन एकच गर्दी केली होती. परिणामी हायवेवर बकरी खरेदी विक्री करणाऱ्यामुळे यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. दरम्यान पोलिसांत देखत बाजारात गर्दी होत असल्याचे पाहुन अनेकांनी याबाबत कमालीचे आश्चर्य व्यक्त केले. याबाबत प्रशासन काय भुमिका घेते याकडे लक्ष लागुन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT