Kothambiri market 
जळगाव

मसालेदार भाजीवर कोथंबीरी रुसली...पहा प्रतिकिलो काय आहे दर! 

संजय पाटील

पारोळा : सर्व प्रकारच्या मसालेदार भाज्या, स्वादीष्ट व नमकिन पदार्थात कोथंबीर शिवाय चव नाही. अशा भाजीपाल्यातील सर्वसमावेशक ठरलेल्या कोथंबीरचे रोज भाव वाढत असुन भाजीपाला लिलावात कोथंबीर 180 रुपये प्रतिकिलोने विकली गेल्याने मसालेदार भाजीवर कोथंबीर रुसल्याचा प्रत्यय येत आहे. अनेकजण विना कोथंबिरने काम भागवित असल्याचे गृहीनींनी माहिती दिली. 
पाच ते सहा महिन्यांपासून कोरोना संसर्गामुळे अनेक बागायतदार भाजीपाला उत्पन्न करणारे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. कोरोनामुळे भाजीपालाचे उत्पादन करावे कि नाही असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला. परिणामी जीवाची पर्वा न करता अनेकांनी कोरोनाला झुगारुन चांगले उत्पन्न काढण्याची भुमिका घेतली. दरवर्षाप्रमाणे यंदाही मालास विक्रमी भाव मिळेल; या आशेपोटी अनेकांनी शेतात कोथंबीरचे पिक घेतले. परंतु संततधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे कोथंबीर पिक सडून गेले. परिणामी बाजारात आवक कमी झाल्याने कोथंबीरने 150 च्या पुढे आकडा गाठला. आज बाभळेनाग येथील शेतकरी सुभाष आनंदा महाजन यांनी कोथंबीर 150 ते 180 भावाने विकली. यावेळी आडती लखन महाजन यांनी आवक कमी असल्यामुळे कोथंबीरचे भाव कडाळल्याचे सांगितले. 

किरकोळ विक्रीत भाव जास्तच 
पारोळ्यातील भाजीपाला मार्केटमध्ये अमळनेर, धुळे, जळगाव येथील भाजीपाला विक्रीस येत असतो. दरम्यान कोरोना काळात ग्राहकात सामाजिक अंतर ठेवुन प्रत्येकवेळी काळजी घेवुन भाजीपाला विक्री करावी लागत असल्याचे भाजीपाला विक्रेते गोपाल महाजन यांनी सांगितले. दरम्यान लिलावात कोथंबिर 180 रूपये किलोने विकली जात असल्याने किरकोळ विक्री करणारे भाजी विक्रेते ते 200 रूपये किलोने विकत आहेत. 

कोथंबीरनंतर टोमॅंटो खातोय भाव 
सहा महिन्यांपुर्वी दहा रुपये किलोने विकला जाणारा टोमॅंटोला आज सर्वच पाले भाज्यांमध्ये चढता भाव असुन दररोज 50 ते 60 रुपये किलोने चांगल्या प्रतीचा टोमॅंटो बाजारात विकला जात आहे. 

भाजीपाल्याचे किरकोळ विक्रीचे भाव 

भाजी प्रतिकिलो दर 
कोथंबीर.. 200 रुपये 
टोमॅंटो... 50 रूपये 
मेथी......60 रूपये 
वांगे..... 40 रूपये 
कोबी.... 60 रूपये 
हिरवी मिरची...20 रूपये 

संपादन : राजेश सोनवणे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India: सूर्याचेच नाही, तर शुभमन गिलचेही वन डे कर्णधारपद जाणार; २०२७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत 'हा' खेळाडू कॅप्टन दिसणार

आनंदीचं अपहरण करणार विद्याधर ! पहिल्यादांच निगेटिव्ह भूमिका साकारण्याविषयी अभिनेता म्हणतो..

Latest Marathi News Live Update : "TVK ने CPI, CPI(M) आणि VCK यांच्याशी संपर्क साधला

West Bengal CM: बंगालमध्ये आता 'दीदी' नाहीतर 'दादा'चं राज्य! सुवेंदू अधिकारी नवे मुख्यमंत्री होणार, उपमुख्यमंत्री पदाबाबतही मोठा निर्णय

Nashik Ring Road : नाशिक रिंग रोडसाठी 367 हेक्टर जमीन संपादित होणार! शेतकऱ्यांचा विरोध असतानाही कोर्टाने स्थगिती का नाकारली? पेसा क्षेत्रातील 'हा' पेच जाणून घ्या

SCROLL FOR NEXT