bhujal prakalp
bhujal prakalp 
जळगाव

‘भूजल’मध्ये या दोन तालुक्‍यातील ६३ गावांचा समावेश 

चंद्रकांत चौधरी

पारोळा (जळगाव) : राज्यातील भूजल पातळीमध्ये वाढ व्हावी म्हणून केंद्र सरकारकडून राज्यात राष्ट्रीय भूजल व्यवस्थापन सुधार प्रकल्प राबविला जाणार आहे. या अंतर्गत राज्यातील १३ जिल्ह्यातील १ हजार ४४३ गावांची निवड करण्यात आली असून, यात जळगाव लोकसभा मतदार संघातील अमळनेर, पारोळा या दोन तालुक्यांमधील ६३ गावांचा समावेश झाल्याने या गावांना या योजनेचा लवकरच लाभ मिळणार असल्याची माहिती खासदार उन्मेष पाटील यांनी ‘सकाळ’ला दिली. 
केंद्र सरकारने या प्रकल्पाची घोषणा २०१९ मध्ये केली होती. त्यावर अध्ययन करून ती आता अमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०२० - २१ ते २०२४ - २५ या पाच वर्षांच्या काळामध्ये ही योजना राबविली जाणार असून, यासाठी १२५ कोटी ७७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही योजना राबविताना अतिशोषित, शोषित, अंशतः शोषित पाणलोट क्षेत्रांना प्राधान्य दिले जाईल. या मध्ये जळगाव लोकसभा क्षेत्रातील ६३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. राज्याच्या २०१३ मधील भूजल अहवालानुसार ७४ शोषित, ४ अंशतः शोषित असलेली १११ पाणलोट क्षेत्रामध्ये ही योजना प्राधान्यक्रमाने राबवली जाणार असून, अमळनेर, पारोळा या तालुक्यातील ६३ गावांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या सर्व ठिकाणी आगामी पाच वर्षांच्या काळात ही योजना राबविण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे. 

पारोळा तालुक्यातील गावे 
अंबापिंप्री ,बहादरपूर, भोलाणे, जामदे, बोदर्डे, वंजारी खुर्द, हनुमंतखेडे, इंधवे वडगाव प्र, अमळनेर, जिराळी, जोगलखेडे, कामतवाडी, खोलसर, महलपूर, मेहू, हिवरखेडा, मोरफळ, पळासखेडेसिम, पिंपळकोठा, पुनगाव, शेवगे बुद्रुक, शिरसोदे, सुमठाणे, टेहू, उंदनिखालसा, उदनिदिगर, उंदिरखेडा, वसंतनगर, विचखेडे, वाघरे, वाघरी या गावांचा समावेश करण्यात आला आहे. 

अमळनेर तालुक्यातील गावे 
अमोदे, अंतुर्ली, राजमाने, बोहरे, चौबारी, धानोरे, धार, फाफोरे बुद्रुक, गलवाडे बुद्रुक, बोरगाव, हेडवे, हिंगणे बुद्रुक, हिंगणे खुर्द प्र.ज., इंद्रपिंपरी, जैतपीर, करण खेडे, कावपिंप्री, अंबारे, खापरखेडा प्र डांगरी, लाडगाव, नांदगाव, मालपूर, मंगरूळ, मारवाड, मुडी प्र अमळनेर, दरेगाव, प्रगणे डांगरी, सडावन खुर्द, शिरुड, टासखेडे, वाघोदे या गावांचा समावेश आहे. 

सिंचन पातळी वाढणार 
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अटल भूजल योजनेत अमळनेर आणि पारोळा तालुक्यातील ६३ गावांचा समावेश झाल्याने या गावांची सिंचन पातळी वाढणार असून, हा परिसर अधिक सुजलाम् सुफलाम् होईल, असा विश्‍वास खासदार उन्मेष पाटील यांनी व्यक्त केला. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, अमित शाहांनी बजावला मतदानाचा हक्क

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT