जळगाव

पारोळा कृउबा समिती संचालक मंडळास सहा महिने मुदत वाढ

संजय पाटील

पारोळा ः येथील कृषि उत्पन्न बाजार समिती  या बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत ता, 18 सप्टेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळास पुढील मुदतवाढ मिळणेसाठी प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगांव यांनी शासनास सादर केला होता.


कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचा विचार करता, कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी महसूल व वन विभागाच्या ता,३१ ऑगस्ट २०२० रोजीच्या आदेशान्वये राज्याच्या लॉकडाऊन कालावधी ता, ३० सप्टेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आला आहे. तसेच अद्यापही साथीच्या रोग आटोक्यात येण्यास आणखी अवधी लागणार आहे. या परिस्थितीत राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका घेणे उचित होणार नाही असे प्रस्तावाद्वारे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगांव यांच्या कडून शासनास सांगण्यात आले.

यावर वरील सर्व बाबी लक्षात घेता बाजार समितीच्या संचालक मंडळास मुदतवाढ देणे योग्य असल्याचे शासनाच्या लक्षात आले. त्याआधारे महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ कलम १४ (३) शासनास प्राप्त अधिकाराचा वापर करून पारोळा कृषि उपन्न बाजार समिती, जि.जळगांव या बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळास दिनांक – 19सप्टेंबर 2020 पासून पुढील सहा महिने म्हणजेच ता, १८ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यास ता, १० सप्टेंबर २०२० रोजी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागा कडून आदेशाद्वारे शासनाची मान्यता देण्यात आली आहे. या मुदतवाढी बद्दल कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, एरंडोल विधानसभेचे आमदार चिमणराव पाटील यांचे आभार मानले आहेत.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs LSG Live: चर्चा तर होणारच... अजिंक्य रहाणेचा अतरंगी Six! रिषभ पंतच्या मास्टरस्ट्रोकने LSG ला विकेट मिळवून दिली Video Viral

Mumbai Airport Fire: मुंबई विमानतळावर आग; शॉर्टसर्किटमुळे घटना घडल्याचा अंदाज

119 इंच कंबर आणि 545 किलो वजन... 9 वर्षे अंथरुणाला खिळलेला, हा जगातील सर्वात मोठी कंबर असलेला माणूस

Latest Marathi News Live Update : जनगणनेच्या कामातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती

Navi Mumbai Airport News: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्ती व्यवस्थापनाची भव्य मॉक ड्रिल; विविध यंत्रणांचा समन्वय आणि सज्जतेची यशस्वी चाचणी

SCROLL FOR NEXT