जळगाव

कोरोना ही तोडू शकली नाही 375 वर्षाची अखंडित परंपरा, कोणती ? तर वाचा !   

संजय पाटील

पारोळा : येथील श्री बालाजी मंदिर येथे श्री बालाजी महाराजांना श्रीमद भागवत महापुराण ऐकवण्याची प्रथा व परंपरा आजही अखंडित आहे. बालाजी भक्त श्री गिरिधर शेठ शिंपी यांनी बालाजी महाराज यांची मूर्ती भक्तांना दर्शन घेता यावे म्हणून मंदिरात स्थापित केली. 

तेव्हा पासून अर्चक हे दरवर्षी भाद्रपद शुद्ध नवमी ते पौर्णिमा श्रीमद्भागवत संहिता पारायण श्री बालाजी महाराजांच्या समोर वाचतात .दुसऱ्या दिवशी म्हणजे भाद्रपद वद्य प्रतिपदेला श्रीभगवत गीता व गोकर्ण कथा होऊन सप्ताहाचा विश्राम होतो. ज्या प्रमाणे सुदाम देव हे देवाला कथा ऐकवत त्याच प्रमाणे येथेही देवासाठी संहिता पारायण होते . मुळ संस्कृत पारायणाचे या ठिकाणचे हे सुमारे 379 वे वर्ष आहे. कालांतराने म्हणजे सुमारे एकशे तेवीस वर्षापासून भक्तांसाठी मराठी प्रौष्ट पदिस प्रारंभ झाला.

द्वितीय सत्रात अनेक भाविक कथा श्रावण करतात
ह्या वर्षी मात्र कोरोना महामारी च्या विश्व संकटामुळे द्वितीय सत्रातील प्रौश्टपदी ही होणार नाही .केवळ प्रथम सत्रातील संहिता पारायणास आज प्रारंभ झाला. श्रीमद् भागवत महापुराण संहिता वाचन पाचव्या पिढीतील अर्चक संजय लक्ष्मण पाठक शास्त्री हे करीत असतात.

कोरोनाचे संकट नष्ट होवो

श्री बालाजी संस्थान चे व्यवस्थापकीय विश्वस्त व बालाजी भक्त गिरिधर शेठ यांचे आठवे वंशज श्रीकांत रघुनाथ शिंपीव हे प्रधान संकल्प करून श्रीमद्भागवत महापुराण ग्रंथ व आचार्य व्यास पूजन करतात ही परंपरा व्यवस्थापकीय विश्वस्त व अर्चक दोघेही अखंडित व काटेकोरपणे चालवीत आहे. कोरोनाचे विश्वावर कोसळले ले महामारी चे संकट नष्ट होवो असा प्रधान संकल्प यावेळी करण्यात येऊन श्रीमद्भागवत रुपी भगवंतास विश्वा च्या वतीने विनंती केली.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झुपेडियानं लुटलं! फोटोला रिव्ह्यू देताच पैसे मिळणार, स्कीमने गंडवलं; तरुणांसह शिक्षक अन् कर्मचाऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक

Latest Marathi News Updates : आरोग्य मंत्री प्रकाश आंबिटकर यांच्या सुरक्षेत मोठी चूक...

Crime News: प्रेमविवाहाचा भीषण शेवट! पतीने पत्नीला रस्त्यावर गोळ्या घालून संपवलं, मृतदेहाजवळ पिस्तूल घेऊन उभा राहीला

"मला तो मुलगा आवडला" लग्नाबद्दल रिंकूचा खुलासा; म्हणाली "मी अतिशय भावनिक.. "

Nagpur Accident: नागपूरच्या गिट्टीखदान चौकात शिवशाही बसच्या धडकेत ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT