Born three children 
जळगाव

अजल सासूला दोनवेळा जूळी तर नात सुनेने तिळ्यांना दिला जन्म

डॉक्टरांनी महिलेची प्रथम तपासणी करून सुलभ प्रसूती व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू केले.

सकाळ डिजिटल टीम

मन्यार परिवारात अमरिनबी यांच्या अजल सासू जैतुनबी शेख गुलाब यांनी दोनदा जुळ्यांना जन्म दिला होता.

रावेर : येथील एका खासगी रुग्णालयात (Hospital) एका २२ वर्षीय महिलेने तीन मुलांना जन्म (Born three children) दिला. आईसह तिघा बालकांची प्रकृती ठणठणीत आहे. हे समजताच दवाखान्यात बघणाऱ्यांची गर्दी झाली होती.


रावेर शहरातील मंगरुळ नाका परिसरातील मुस्ताकिम मन्यार यांच्या पत्नी अमरिन मुस्तकिम शेख (वय २२) यांना प्रसूतीच्या वेदनांमुळे सोमवारी (ता. २) सकाळी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटलचे डॉ. संदीप पाटील यांनी प्रथम तपासणी करून सुलभ प्रसूती व्हावी, यासाठी प्रयत्न केले. शस्त्रक्रिया न करता या महिलेने दहा दहा मिनिटांच्या कालावधीत तीन मुलांना जन्म दिला. ही तिन्ही मुले आहेत. तिघांचेही वजन प्रत्येकी दोन किलोचे आहे. डॉ. संदीप पाटील यांनी सांगितले, की महिलेला पहिल्यापासूनच त्रास होत असल्यामुळे या महिलेच्या पतीला सोनोग्राफीमध्ये तीन बाळ असल्याची माहिती देण्यात आली होती. सुलभ प्रसूती व्हावी, यासाठी डॉ. पाटील यांनी सुरवातीपासूनच औषोधपचार सुरू केले व सोमवारी या महिलेने तिळ्यांना सुलभ प्रसूतीने जन्म दिला. यासाठी हॉस्पिटलचे परिचारिका स्वाती सोनार, उषा चौधरी, सोनम पवार यांची महिलेला सुरक्षित प्रसूती करण्यात भूमिका स्तुत्य होती. डॉ. पाटील व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सुलभ प्रसूती केल्याबद्दल आभार मानले. माऊली हॉस्पिटलमध्ये महिलेने तिळ्यांना जन्म दिल्याची बातमी समजताच बघ्यांची गर्दी झाली.

रावेरला सात वर्षानंतर पुन्हा तिळे

दरम्यान, मन्यार परिवारात अमरिनबी यांच्या अजल सासू जैतुनबी शेख गुलाब यांना पहिल्या वेळेस दोन मुली तर दुसऱ्या प्रसूती वेळी एक मुलगा, एक मुलगी असे दोनदा जुळ्यांना जन्म दिला होता. तब्बल सहा, सात वर्षानंतर शहर व परिसरात तिळ्यांना जन्म दिल्याची माहिती डॉ. संदीप पाटील यांनी ‘सकाळ’ला दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Highway Protest : शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातून पुन्हा एल्गार, सतेज पाटील, राजू शेट्टींच्या सोबतीने शेतकरी ताकद दाखविणार

पाकिस्तानात पेट्रोलच्या दरात ऐतिहासिक कपात; नव्या किमती ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

Fan Safety Tips : घरातला पंखा ठरू शकतो धोकादायक! साधी चूक अन् घर जळून होईल खाक; उन्हाळा सुरू होण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' 2 गोष्टी

Mumbai Local: मुंबईकरांचा खोळंबा होणार, लोकलचे वेळापत्रक बदलणार, कोणत्या मार्गांवर आणि कधी? जाणून घ्या...

Pune Police Recruitment : पोलिस भरतीत ‘शॉर्टकट’चा स्फोट! शक्तीवर्धक पेय घेताच उमेदवाराचा मैदानावर धिंगाणा, थरारक क्षणांनी सर्वच शॉक

SCROLL FOR NEXT