जळगाव

जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांची पाल आदिवासी पाड्यांना भेट

रूग्णालयातील लसीकरण केंद्र, इतर सोयीसुविधेची पाहणी केली

सकाळ डिजिटल टीम



पाल ता रावेर ःकोरोना (corona) महामारीत चांगले लोक मरण पावले आहे जर कोरोनापासून आपले व परिवाराचे संरक्षण करायचे असेल तर सर्वांनी लस (vaccine) घ्या लसबाबत मनातील गैर समज काढून टाका घाबरू नका असे जळगाव जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत (Collector Dr. Abhijit Raut) यांनी रावेर तालुक्यातील अति दुर्गम भागातील निमडया या आदिवासी पाड्यात (Tribal Pade) आयोजित कार्यक्रमात उपस्तीत आदिवासी बांधवाना असे आवाहन केले. (collector abhijit raut meet bu satpuda tribal pade)

रावेर महसूल विभागातर्फे निमडया येथे रेशन कार्ड आणि विविध दाखले वाटप कार्यक्रम घेण्यात आले यात पाच लाभार्थ्यांना रेशनकार्ड वाटप करण्यात आले तसेच दहावन दावे मंजूर करून मान्यता देण्यात आले त्याचबरोबर आदिवासी गोर गरिबांना रेशन वेळेवर देण्यात आहे की नाही याची विचारपूस केली. तसेच उपसरपंच इरफान तडवी यांनी पाल, गारखेडा, निमडयाया रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी जिल्हाधिकारी समोर मांडली.

ग्रामीण रुग्णालयाची केली पाहणी
येथील ग्रामीण रूग्णालयात भेट देवून रूग्णालयातील लसीकरण केंद्र, इतर सोयीसुविधेची पाहणी केली. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांना जळगावला एक ही रुग्ण पाठवायचा नाही सर्व उपचार येथेच करावा काही अडचणी असेल तर लगेच माहिती द्या अशा सुचना जिल्हाधिकारीनी दिली.

कृषी विज्ञान केंद्रात केले वृक्षारोपण
पाल येथील सातपुडा विकास मंडळ पाल संचलित कृषी विज्ञान केंद्र पाल येथे जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन गांडूळ खत प्रकल्प,केळी च्य खोडाच्य धाग्यापासून तयार करण्यात आलेली वस्तूची पाहणी केली भेटीदरम्यान जिल्हाधिकारीयांनी उपस्तीत महिला शेतकर्यांना परसबाग बियाणे किटचे वाटप करण्यात आले तसेच कृषी प्रदर्शनी व कृषी विज्ञान केंद्रच्य विविध उपक्रमबाबत सखोल चर्चा केली कृषी विज्ञान केंद्राच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT