ST- BUS 
जळगाव

कोरोना आटोक्यात तरी..मध्य प्रदेश प्रशासनाची आडमुठी भूमिका

रावेर-बऱ्हाणपूर या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या दोन शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक सुरू असते.

सकाळ डिजिटल टीम

रावेर : महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या आता आटोक्यात असली तरीदेखील मध्य प्रदेश शासनाच्या अडवणुकीच्या धोरणामुळे मध्य प्रदेश पोलिस बऱ्हाणपूरकडे जाणाऱ्या वाहनांना अडवत आहेत. याच पोलिसांसमोर पायी किंवा मोटारसायकलने जाणाऱ्या प्रवाशांना मात्र कोणत्याही चौकशीविना आणि तपासणीविना ये-जा करू दिली जात आहे. मध्य प्रदेश प्रशासनाच्या या अडवणुकीच्या धोरणामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. आता वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनीच मध्य प्रदेश शासनाशी या विषयावर चर्चा करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.


रावेर-बऱ्हाणपूर या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या दोन शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक सुरू असते. मध्यंतरी कोरोना काळात ही ये-जा बंद होती. मात्र अत्यावश्यक कारणासाठी ई-पास तयार करून किंवा कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र दाखवून सीमा ओलांडण्यास परवानगी मिळत होती. आता दोन्ही राज्यांत रुग्णसंख्या अगदीच किरकोळ असताना महाराष्ट्र शासनाकडून मध्य प्रदेशातून येण्यास कोणतीही आडकाठी नाही; परंतु महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात प्रवेश करण्यासाठी मध्य प्रदेश हद्दीतील लोणी नाक्याजवळ पोलिसांनी रस्त्यावर अडथळे निर्माण केले आहेत. एसटी गाड्या अगर भाडोत्री प्रवासी वाहने यांना प्रवेश दिला जात नाही. यावर उपाय म्हणून भाडोत्री प्रवासी वाहनधारक रावेर येथून प्रवाशांना बसवून महाराष्ट्रातील चोरवड नाक्यापर्यंत नेतात. तेथून प्रवासी उतरून त्याच रस्त्याने पायी मध्य प्रदेश हद्दीत प्रवेश करतात आणि मध्य प्रदेश पोलिसांसमोरूनच जाऊन लोणी गावाजवळील पेट्रोलपंपावर उभ्या असलेल्या खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांमध्ये बसतात. जर ये-जा करणाऱ्या प्रवाशांची कसलीच तपासणी अगर चौकशी होत नाही तर एसटीला आणि खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांना थेट बऱ्हाणपूर जाण्यास परवानगी देण्यात काय अडचण आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

RAVER


अर्थपूर्ण संबंधांची चर्चा :
खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीमालकाने मध्य प्रदेश पोलिसांशी आर्थिक व्यवहार केल्यास अशा अगदी मोजक्या गाड्यांना मात्र थेट जाऊ दिले जाते. या दोन टप्प्यांतील प्रवासी वाहतुकीमुळे रावेरहून बऱ्हाणपूर येथे जाण्या-येण्याचा प्रत्येक प्रवाशाचा खर्च ४० रुपयांवरून आता ९०-१०० रुपयांवर गेला आहे. हा वाढीव भुर्दंड प्रवाशांनाच सहन करावा लागत आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात असलेल्या गावांमध्ये दोन्हीकडील लोकांचे नातेगोते, संबंध, देवाणघेवाण आणि बाजारपेठ असून, या रस्त्याने रोज सुमारे पाच ते सात हजार लोक ये-जा करतात. चोरवड ते लोणी असे अर्धा ते एक किलोमीटर पायी जाताना प्रवाशांना अनेक त्रास सहन करावे लागतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठी वाढ! चांदीही 3 लाखांवर; गुंतवणूकदार खुश, मात्र सर्वसामान्यांची चिंता वाढली; पाहा आजचा भाव

Kabanur Protest in Kolhapur : महापुरुषांच्या अवमानकारक वक्तव्यामुळे कबनूरमध्ये तणाव; संतप्त जमावाची इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिस ठाण्याकडे धाव, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला धमकीचा मेल

Video : अरे, ही काय डोक्यावर पडलीय का? Hardik Pandya बाद होताच, गर्लफ्रेंड माहिका शर्माने काय केलं पाहा; नेटिझन्स संतापले

Stock Market Today: ट्रम्प टॅरिफला धक्का देत शेअर बाजार उसळला! सेन्सेक्स 400 अंकांनी वाढला; मात्र IDFC घसरला; कोणते शेअर्स तेजीत?

SCROLL FOR NEXT