Funeral 
जळगाव

मुले–सुनांना कोरोनाची लागण झाल्‍याच्या धक्‍क्‍याने मातेचा मृत्‍यू...पण तिच्यावर अंत्यसंस्‍काराला नातलगही नाही ‍

दिलीप वैद्य

रावेर : कोरोनाची भिती प्रत्‍येकाच्या मनात आहे. आजच्या स्‍थितीला कोणाचा मृत्‍यू झाला तरी देखील अंत्‍यसंस्‍काराला जाण्यास घाबरतात. यात दोन्ही मुले आणि सुनांना कोरोनाची लागण झाली. हा धक्‍का ती माता सहन करू शकली नाही आणि या धक्‍क्‍यात तिचा मृत्‍यू झाला. पण ती माता निगेटीव्ह होती. तरी देखील नातेवाईक देखील तिच्यावर अंत्‍यसंस्‍कार करण्यास पुढे आले नाही. शेवटी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अंबिका व्यायाम शाळेच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत विधिवत अंत्यसंस्कार केले आणि माणुसकीची प्रचिती आणून दिली.

शहरातील उतखेडा रस्त्यावरील शंकर प्लॉट्स भागातील एका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षिकेचे (वय 60) आज सकाळी निधन झाले. या शिक्षिकेची दोन मुले, सुना कोरोना पॉझिटिव्ह असल्याने घरी फक्त पंधरा वर्षांचा नातू आणि शिक्षिका होती. मुले आणि सुना कोरोना पॉझिटिव्ह आल्याने या निवृत्त शिक्षिकेचे धक्क्याने निधन झाल्याचे सांगण्यात येते. एक मुलगा जळगावच्या गोदावरी रुग्णालयात तर दुसरा मुलगा आणि सुना शहरातील कोविड कोरोना सेंटरमध्ये क्वारंटाईन होऊन उपचार घेत आहेत. 

निरोप देवूनही नातेवाईक येईनात
या सेवानिवृत्‍त शिक्षिका मातेचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कार कसे होणार असा प्रश्न निर्माण झाला. निरोप देऊनही नातेवाईक आणि समाज बांधव तिकडे फिरकेनात. मुलांना कोरोनाची लागण झाली असल्‍याने आईला देखील असणार यामुळे अंत्‍ययात्रेला कसे जायचे याची भिती देखील नातेवाईकांच्या मनात होती. यामुळे निरोप दिल्‍यानंतर देखील नातेवाईक आले नाही. दरम्‍यान एकटा नातू आजीच्या मृतदेहाजवळ बसून होता.

स्‍वयंसेवकांचा पुढाकार पण
सदरचा प्रकार कळताच शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि अंबिका व्यायाम शाळेच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. पार्थिव शरीर घरातून बाहेर आणून रितसर हिंदू धर्माप्रमाणे अंत्यसंस्कार केले. यावेळी काही नातेवाईक आणि समाज बांधव उपस्थित झाले. पण त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. येथील उटखेडा रस्त्यावरील स्मशानभूमीत नातवाच्या हातून अग्निडाग देण्यात आला. भास्कर महाजन, सचिन महाजन यांनी या कामी पुढाकार घेतला. येथील क्वारंटाईन सेंटरमधील मुलगा फक्त अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहू शकला.  
 

संपादन : राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

Manchar Accident : दोन भीषण अपघातांत खेड तालुक्यातील दोघांचा व आंबेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

SCROLL FOR NEXT