bird school 
जळगाव

परिवाराची पहाटच पक्ष्यांच्या मंजूळ किलबिलाटाने...शिक्षक भरवतोय पक्ष्यांची शाळा! 

प्रशांत पाटील

तांदलवाडी (ता. रावेर) : आजच्या धावत्या युगात आणि मोबाईलच्या दुनियेत वेळ कुणाकडेच शिल्लक नाही. जो तो आपल्याच विश्वात रमलेला दिसतो. याला अपवाद खिर्डी येथील अ. भा. पाटील विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक प्रवीण धुंदले आहेत. एकेकाळी अवघ्या जगात गौतम बुद्धच असे एकमेव होते की ज्यांनी यज्ञात होणारी पशु-पक्ष्यांची हत्या थांबविण्यासाठी यज्ञात पशू-पक्षी ऐवजी स्वतःचे जीवन देण्याची तयारी दाखवली होती. गौतम बुद्धांनी दिलेली शिकवण येथील शिक्षक धुंदले अंगीकारत आहेत. 

खिर्डी येथील शिक्षक कॉलनीतील रहिवासी असलेले प्रवीण धुंदले यांच्या अंगणात वर्षभर वेगवेगळ्या पक्ष्यांची शाळा भरते. त्यांच्या परिसरात व मेहनतीने फुलवलेल्या बागेत आंबा, पेरू, सीताफळ, चिकू, भोकर, कडुलिंब व फुलझाडांची संख्या जास्त असल्याने भुकेने आणि तहानेने व्याकूळ झालेले पक्षी त्यांच्या फुलवलेल्या बागेत दाखल होतात. धुंदले परिवाराची पहाटच पक्ष्यांच्या मंजूळ किलबिलाटाने होत असते. दररोज अंगणात येणाऱ्या चिमण्या, पोपट, कोकीळ, भारद्वाज, मैना, बुलबुल यांसह अनेक पक्ष्यांची वर्दळ कायम असते. यांत पोपटांची संख्या अधिक आहे. पक्ष्यांसाठी सकाळी लवकर उठून धान्य व पिण्यासाठी पाणी ठेवतात. कुणी धान्य टिपताना तर कुणी पाणी पिण्यात दंग, तर काही मातीच्या ठेवलेल्या भांड्यांवर मनमोकळेपणाने आंघोळ करतानाची विहंगम दृश्‍य येथे पहावयास मिळतात. 
एकीकडे पक्ष्यांची संख्या दुर्मिळ होत चाललेली असताना पक्षीमित्र धुंदले यांच्या अंगणातील धान्य व फळे चाखायला मिळत असून त्यांच्या किलबिलाटाने ते पशुपक्ष्यांप्रती आपले नाते घट्ट ठेवत असून, त्यांच्या या महान कार्याबद्दल परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. 


भुकेल्याला अन्नदान करण्याची प्रेरणा मला माझे आई-वडील, गुरुवर्य व मित्र परिवाराकडून मिळालेली आहे. दुर्मिळ होत चाललेले पक्षी व त्यांची संख्या वाचविण्यासाठी दररोज धान्य व पाण्याची व्यवस्था करून निसर्गाप्रती आपले नाते घट्ट ठेवण्याचा मी प्रयत्न करीत आहे. पक्ष्यांच्या किलबिलाटाने मला खूप आनंद मिळतो. 
- प्रवीण धुंदले, उपक्रमशील शिक्षक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election साठी भाजप-शिवसेना एकत्र, पण राष्ट्रवादीचा उल्लेख नाही, जागावाटपाचा फॉर्म्युलाच सांगितला!

Dhurandhar Craze in Pakistan: पाकिस्तानात ‘धुरंधर’ पाहण्याची क्रेझ! बंदी असतानाही लोक कसे पाहतायत चित्रपट?

Kolhapur Property Survey : करवीर तालुक्यात ऐतिहासिक सर्वेक्षण; १३२ गावांतील ४० हजार मिळकतींना युनिक ओळख

Agriculture News : नाशिकमध्ये रब्बी पीकविम्याला थंडा प्रतिसाद! ४ लाख शेतकरी विम्यापासून दूर; काय आहे कारण?

Latest Marathi News Live Update : वर्धेच्या देवळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा

SCROLL FOR NEXT