crime crime
जळगाव

महिनाभरात चोरट्यांनी दहा लाख किमतीचे शेतातील साहित्य केले लंपास

तीन दिवसांत पुन्हा रात्री नव्याने टाकलेल्या सहाशे फूट वायर चोरीला गेल्या.

सकाळ वृत्तसेवा

तांदलवाडी : येथील परिसरात कृषिपंपाच्या (Agricultural pump) चोऱ्यांचे (Thefts) प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, महिनाभरात तब्बल दहा लाखांच्या केबल (Cable) चोरीला गेल्याचे समोर आले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये (Farmers) भीतीचे वातावरण असून, चोरट्यांनी थेट पोलिसांना (Police) आव्हान दिले आहे. (tandalwadi village agricultural material thief is stealing)

परिसरात २ जूलैच्या रात्री चोरट्यांनी सावदा पाणीयोजनेच्या पंपगृहाजवळून कृषिपंपाच्या केबल लंपास केल्या. यात तांदलवाडी येथील सुभाष महाजन यांची पाचशे फूट केबल, गोपाल महाजन यांची शंभर फूट, तर विजय हिवराळे (रा. मांगलवाडी) यांची ४५० फूट केबल चोरीला गेली. मार्चमध्ये शेतकरी जगदीश नमायते व गोपाळ महाजन (रा. तांदलवाडी) यांच्या पाचशे फूट, भूषण चौधरी व शांताराम चौधरी यांच्या बाराशे फूट केबल वायर चोरीस गेल्या होत्या. नंतर तीन दिवसांत पुन्हा रात्री नव्याने टाकलेल्या सहाशे फूट वायर चोरीला गेल्या.

Thefts

महिना होत तोच पून्हा चोरी..

घटनेला महिना होत नाही, तोच शांताराम चौधरी, के. टी. पाटील, दीपक चौधरी, जगदीश नमायते, गोपाळ महाजन (सर्व रा. तांदलवाडी) राहुल हिवराळे व बाळकृष्ण हिवराळे (रा. मांगलवाडी) यांच्या केबल वायर २४ जूनच्या मध्यरात्री चोरीला गेल्या होत्या. सततच्या चोऱ्यांमुळे परिसरातील शेतकऱ्यांना फार मोठा आर्थिक व मानसिक त्रास होत आहे. चोरट्यांना कृषिपंपाच्या केबलमधून तांबे सहज मिळत असल्याने चोऱ्या वाढल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी वारंवार होणाऱ्या चोऱ्यांना वैतागून कॉपरऐवजी नाइलाजास्तव ॲल्युमिनिअमच्या वायरचा वापर सुरू केला आहे.

पोलिस प्रशासनापुढे आव्हान
शेतकरी सुभाष महाजन यांच्या फिर्यादीवरून निंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. वैभव महाजन, अक्षय चौधरी, सुनील महाजन व पोलिस कर्मचारी उपस्थित होते. पोलिस नाईक ईश्वर चव्हाण तपास करीत आहेत. दरम्यान, परिसरात रात्रीची गस्त वाढविण्यात आली आहे. तसेच रात्री वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात आजचा भाव किती? जाणून घ्या CNGचे दरही

अरुणा इराणी यांच्यावर दु:खाचा डोंगर; पती कुकू कोहली यांचं 77व्या वर्षी निधन

Kolhapur Konkan New Road: कोल्हापुरातून कोकणात जाण्यासाठी आणखी एक घाटमार्ग, घोटगे-सोनवडे मार्गासाठी केंद्राची मंजुरी; कुडाळ-कोल्हापूर अंतर होणार कमी

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

SCROLL FOR NEXT