जळगाव

भाई का बर्थ डे’ पडला महागात; डीजेसह लाखोंचे साहित्य जप्त !

विनोद सुरवाडे

वरणगाव  : कोरोनाच्या परिस्थितीत विनापरवानगी सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करण्याचे येथील निजाम कलिम शेख याला चांगलेच महागात पडले आहे. वरणगाव पोलिसांनी डिजेसह लाखो रुपयांचे साहित्य जप्त केले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वरणगाव येथील प्रभाग क्रमांक दोनमधील निजाम कलिम शेख (रा. वरणगाव) याचा वाढदिवस असल्याने भोगावती नदीपात्रातील पुलाजवळील ठिकाणी शेकडो लोकांची गर्दी जमवून डिजेच्या तालावर केक कापण्याचे नियोजन होते. त्याकरिता शुभेच्छुकांसाठी शेकडो खुर्च्यांसह भव्य स्टेज उभारण्यात आले होते. भरीसभर म्हणून शेकडो समर्थकांनी मोटर सायकल रॅली काढून घोषणा देत शहराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यामुळे सदर प्रकार वरणगाव पोलिस स्टेशनचे साहाय्यक पोलिस निरीक्षक संदिपकुमार बोरसे यांना माहित झाल्याने जप्तीची कारवाई करण्यात आली. 


सदरील ठिकाणी आयोजकांनी डिजे व लाईटसाठी इलेक्ट्रीक तारांवर आकडे टाकून विजप्रवाह घेतला होता. राज्य शासनाकडून वारंवार कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याचे जिल्हा प्रशासनाला सांगण्यात येत आहे. असे असतानाही अशा पध्दतीने सार्वजनिक ठिकाणी शेकडो लोकांची गर्दी जमवून संसर्गाला खतपाणी घालण्याचे प्रकार समोर येत आहेत. साहित्य जप्त करताना एपीआय संदिपकुमार बोरसे, पीएसआय सुनील वाणी, पोलिस कर्मचारी फिर्यादी राहुल येवले, नवाब शहा, बापू पाटील, शांतीलाल सोनार आदी हजर होते. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT