yawal nagarpalika
yawal nagarpalika 
जळगाव

अन्‌ यावल नगरपालिकेला मिळणार नवा नगराध्यक्ष

सकाळवृत्तसेवा

यावल : नगरपालिकेच्या रिक्त असलेल्या नगराध्यक्षपदाच्या नियुक्तीसाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून 14 जुलैस अनुसूचित जमाती महिला राखीव असलेल्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी विशेष सभेला पीठासीन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले असतील. विशेष म्हणजे महाआघाडी शासनाने लोकनियुक्त पद्धतीची नगराध्यक्ष व सरपंच निवड रद्दबातल केल्यामुळे नगराध्यक्षपद निवडीसाठी नगरसेवकांमधून निवड होईल. 

पालिकेत अनुसूचित जमाती महिला म्हणून प्रभाग क्रमांक 3 मधून निवडून आलेल्या नौशाद मुबारक तडवी या एकमेव अनुसूचित जमाती महिला सदस्य असल्यामुळे नगराध्यक्षपदी श्रीमती तडवी यांची बिनविरोध निवड होऊन त्या विजयी होण्याची औपचारिकता बाकी आहे. येथील शिवसेनेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सुरेखा कोळी यांनी अनुसूचित जमातीचे वैध जात प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्यामुळे पालिकेचे मुख्याधिकारी यांनी तसा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केला होता. दरम्यान याच मुद्यावरून श्रीमती कोळी यांचेविरुद्ध माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडे तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाची दखल घेत तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी 28 नोव्हेंबर 2019ला लोकनियुक्त नगराध्यक्ष सुरेखा कोळी यांना पदावरून पदच्युत करीत अपात्र घोषित केले होते. दरम्यान, श्रीमती कोळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात राज्याच्या नगरविकास विभागाकडे अपील दाखल केले होते. मात्र नगरविकास विभागानेही त्यांचे अपील फेटाळून नगराध्यक्षपद अपात्र केले होते. 
 
निवडीचा कार्यक्रम असा 
अर्ज दाखल करणे : 6 ते 7 जुलै सकाळी 11ते दुपारी 2 पर्यंत 
अर्जाची छाननी :7 जुलै दुपारी 2 वाजेनंतर 
अपील दाखल करणे : 8 ते 10 जुलै सायंकाळी 5 वाजेपर्यंत 
वैध अर्ज यादी प्रसिद्ध : 10 जुलै सायंकाळी 5 वाजेनंतर 
उमेदवारी मागे घेणे : 13 जुलै दुपारी 4 वाजेपर्यंत 
निवडणूक सभा : 14 जुलै सकाळी 11 वाजता 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT