जळगाव

अरेच्चा... पोलिस गाडीवर सायरनचा आवाज नव्हे...तर साने गुरुजींच्या कविता !

प्रकाश चौधरी

चुंचाळे ता.यावल ः जगभरासह देशात कोरोना विषाणूचे संकट अजून ही कायम आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यामधील साकळी मध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यात गावात काही किरकोळ कारणामुळे अशांततेचे वातावरण निर्माण झालेले असल्याने गावाच्या प्रतिमेस बाधा निर्माण होत आहे. नेहमीच होणाऱ्या काही अप्रिय घटनांनी गावाची शांतता धोक्यात येत असते व या अशा वारंवार निर्माण होणाऱ्या परिस्थितीमुळे गावाची प्रगतीकडे वाटचाल न होता गाव एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचले आहे. 

हि बाब नेहमी धार्मिक एकोपा दाखवणाऱ्या साकळी गावासाठी फार चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर यावल पोलीस प्रशासनाकडून पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या संकल्पनेतून व लोकांमध्ये धार्मिक एकते बाबत जनजागृती व्हावी याकरिता 14 रोजी पोलिस प्रशासनाकडून लोकसहभागातून एका सुंदर प्रयोग राबविला. यात संपूर्ण गावातून आपल्या पोलिस प्रशासनातील कर्मचारी यांच्या सहभागाने रूट मार्च काढला.तर या रूट मार्च मध्ये पोलिस प्रशासनाच्या गाडीवर ऑडिओ च्या आवाजात परमपूज्य साने गुरुजी यांच्या 'खरा तो एकची धर्म - जगाला प्रेम अर्पावे' अशा मानवतेच्या गीतांचा सुंदर सुर सर्वत्र कानी पडत होता.

पोलीस निरीक्षकांनी स्वःता माईक घेत...
पोलीस निरीक्षक धनवडे हे स्वतः माईक हातात घेऊन वेगवेगळ्या धार्मिक महामानव व विविध राष्ट्र पुरुषांबद्दल सांगत गावात सर्व धर्मांनी भाईचारा टिकवला पाहिजे. सर्वांनी एकटीने राहिला पाहिजे. एकमेकांच्या धर्माचा आदर व सन्मान केला पाहिजे. तेव्हाच आपल्या गावाची आदर्श अशी धार्मिक एकता मजबूत होईल. व गावाचा धार्मिक एकतेचा सुगंध सर्वत्र देशभर दरवळेल यासाठी सर्व नागरिकांचं एकत्रित गुण्यागोविंदाने राहणं फार गरजेचा आहे. याबाबत अगदी स्पष्ट व नागरिकांना भावेल अशा शाब्दिक आशयात जनजागृती केली. या रुट मार्चच्या दरम्यान श्री धनवडे यांनी गावातील शाळकरी मुलांकडून 'सारे जहासे अच्छा हिंदुस्तान हमारा' यासारखी काही देशभक्तिपर गीते म्हणून घेतली. तर काही नागरिकांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. पोलीस निरीक्षक श्री धनवडे यांच्या संकल्पनेतील या आगळ्यावेगळ्या व धार्मिक एकता जपण्याबाबतच्या अभिनव प्रयोगाचे गावात सर्वत्र नागरिकांकडून तोंडभरून कौतुक केले. 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT