जळगाव

पाचोऱ्यात ज्‍युनियर बाबा गँग; बंदोबस्ताची मागणी

सकाळ डिजिटल टीम

पाचोरा (जळगाव) : शहर व शहरालगतच्या वसाहतीत गेल्या दोन– तीन दिवसांपासून साधूचा वेश परिधान केलेल्या आठ ते बारा वर्षे वयोगटाच्या ज्‍युनियर बाबा गँगने भिक्षा मागण्याच्या हेतूने नागरिकांना पैशांची मागणी करत आहेत. या बालकांचा व त्यांच्या प्रमुखाचा शोध घेऊन बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. (pachora-junior-baba-gang-people-action-and-Demand)

शहरात आठ ते बारा वयोगटाची बालके अंगात भगवी वस्त्र, डोक्यावर फेटा ,हातात कमंडलू, खांद्यावर बॅग, कपाळी टिळा असा साधू सदृश्य पेहराव करत घरोघरी जाऊन भीक्षा मागतात. महिला व वृद्धांना सावज करतात. धार्मिक वृत्ती ओळखून पैशांची मागणी करतात. या बालकांना उत्कृष्टपणे बोलण्याचे प्रशिक्षण देण्यात आले असून ते बोलण्यात पटाईत आहेत. समोरच्या व्यक्तीस भावनिक करून त्यांच्याकडून पैसे काढण्याचे तंत्र या बालकांना अवगत आहे.

तर थेट घरात प्रवेश

एखाद्याने त्यांची जास्तच आस्थेवाईकपणे चौकशी केल्यास ते भोजनासाठी गळ घालतात व घरात प्रवेश मिळवतात. घरात आल्यानंतर पैसे घेतल्याशिवाय बाहेर पडत नाहीत. अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. या बालकांचा कोणी तरी म्होरक्या असावा हे बालक निरक्षर असून त्यांना धर्म ज्ञान, मंत्र तंत्र, पूजाअर्चा याबाबत कोणतेही ज्ञान नसले; तरी त्यांची बोलण्याची लकब वाखाणण्यासारखी आहे. बालकांचे चेहरे निरागस असले तरी त्यांच्या डोळ्यात मात्र गुन्हेगारीची झलक जाणवते. पोलिसांनी या बालकांचा शोध घेऊन त्यांचा व त्यांच्या म्होरक्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी वसाहतीतील रहिवाशांतर्फे केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यातल्या शिक्षक, पदवीधर निवडणुका पुढे ढकलल्या; निवडणूक आयोगाचा निर्णय

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार खरेदी; सेन्सेक्स 340 अंकांनी वधारला, कोणते शेअर्स तेजीत?

Samir Choughule: "तुझ्या विना माझे सतत..."; बायकोच्या वाढदिवसानिमत्त समीर चौघुलेंची खास पोस्ट

Delhi Liquor Scam: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 'आप' पक्षही आरोपी, ईडीची हायकोर्टात माहिती

Marathi News Live Update: "केंद्र सरकार लोकतंत्र नव्हे 'धनतंत्र' चालवत आहे", जयराम रमेश यांची टीका

SCROLL FOR NEXT