जळगाव

अमळनेर कृउबा पुन्हा माजी सभापतींकडे

सुनील पाटील

अमळनेर : अशासकीय संचालक मंडळ बरखास्त करत पुन्हा एकदा विद्यमान संचालकांकडे बाजार समितीचा कार्यभार न्यायालयाच्या आदेशाने आला आहे. कोरोनाच्या काळात निवडणूक घेता येत नसल्यामुळे अमळनेर बाजार समितीवर विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ मिळावी म्हणून शासनाकडे संचालक मंडळाने अर्ज केलेला होता.

मात्र, जिल्ह्यातील भाजपच्या ताब्यात असलेल्या बहुतांश बाजार समितीवर शासनाने आधी प्रशासक नेमला होता. त्यानंतर शासनाच्याच आदेशाने अशासकीय संचालक मंडळ काही दिवसांपूर्वीच बसविण्यात आले होते. याविरुद्ध अमळनेर येथील संचालक मंडळाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. बाजार समितीच्या संचालकांनी पाठवलेल्या मुदतवाढीचा अर्जावर मुदतीत निर्णय घ्यावा व तोपर्यंत विद्यमान संचालक मंडळाने कामकाज पाहावे, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला असल्याचे बाजार समितीचे सभापती प्रफुल्ल पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यानुसार त्यांनी बाजार समितीच्या सभापतिपदाचा कार्यभार पुन्हा एकदा स्वीकारला आहे. या वेळी माजी आमदार स्मिता वाघ व बाजार समितीचे संचालक मंडळ उपस्थित होते. 

न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा एकदा पदभार हाती घेतला आहे. राहिलेली विकासकामे पूर्ण करण्याचा येत्या काळात प्रयत्न करू. 
-प्रफुल्ल पवार, सभापती, बाजार समिती अमळनेर 

जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी व सेनेच्या ताब्यातील बाजार समित्यांना मुदतवाढ दिली. मात्र, ज्या बाजार समित्या भाजपच्या ताब्यात होत्या त्यावर प्रशासक नेमण्यात आले. त्यानंतर अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यात आली. ‘भगवान के घर देर है लेकिन अंधेर नही’, या उक्तीप्रमाणे न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. त्यानुसार येत्या काळात शेतकरी बांधवांसाठी जोमाने काम करू. 
- स्मिता वाघ, माजी आमदार 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: भारतीय सैन्याकडे पाहून साताऱ्यातील लष्करी कुटुंबे आनंदी : PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT