जळगाव

मंदिराच्या भोंग्यातून येणारे अभंग, किर्तनाचे स्वर झाले बंद, आणि आता पाढे, इंग्रजी कविता येतात ऐकू !

सुधाकर पाटील

भडगाव : गावातील मंदिराच्या भोंग्यावरून कायम अभंग, कीर्तन, देवी दिव्याच्या आरत्या कानी पडतात मात्र पिंपळगाव बु. ( ता.भडगाव) येथील देवाच्या मंदिरावरील सार्वजनिक भोंग्यातुन दररोज सकाळी आणि संध्याकाळी 2 पासून 30 पर्यंतचे संगीतमय पाढे, इंग्रजी फोनिक्स सॉंग, विविध उपयुक्त ऑडिओ क्लिप्स गावातील सर्व विद्यार्थ्यांना नियमितपणे ऐकवले जात आहेत. त्यामुळे गावाचे वातावरण पुर्णपणे शैक्षणिक झाले असल्याचे चित्र आहे. तर या आगवेगळी शिक्षण पध्दत सर्वत्र चर्चेची ठरली आहे. 

कोरोनाचा दिवसागणिक वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील सर्व शाळा अद्यापही बंदच आहेत. त्यामुळे ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्याना शिक्षण दिले जात आहे. ऑनलाईन शिक्षणात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मात्र पिंपळगाव बु. येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्याना सहजरीत्या शिक्षण देण्याचा अफलातुन पध्दत शोधली आहे. गावातील एकविरा देवीच्या मंदिरावरील भोंग्याच्या माध्यमातून गावातील विद्यार्थ्याना शिकवण्याची शक्कल लढविली आहे.

भोंग्यातुन ऐकू येता पाढे...

ग्रामीण भागात प्रत्येक मंदिरावर ध्वनीक्षेप असतात. त्याव्दारे पुर्ण गावात अभंग, कीर्तन, देवांचे गाणे, आरत्या दररोज सकाळी व संध्याकाळी ऐकायला मिळतात. हे च हेरून पिंपळगाव बु. येथील जिल्हा परिषद शाळेचे शाळेचे मुख्याध्यापक अरुण पाटील सहकारी शिक्षक प्रतिभा बाविस्कर, सचिन पाटील, अमर बरडे,अमोल बागल यांनी या मंदिरावरील भोंग्याच्या माध्यमातूनच विद्यार्थ्याना शिक्षणाचे धडे देण्याचा निर्णय घेतला. दररोज सकाळी व संध्याकाळी या भोंग्यातुन संगीतमय पाढे, इग्रंजी फिनिक्स साॅग, विविध उपयुक्त ऑडीयो क्लिप ऐकविल्या जातात. त्यामुळे गावाचे वातावरण सध्या शिक्षणमय झाले आहे. या उपक्रमाला विद्यार्थ्याचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मुख्याध्यापक अरूण पाटील यांनी सांगितले. 

डिजिटल शिक्षणावरही भर

गावातील ज्या विद्यार्थ्यांकडे डिजिटल साधने उपलब्ध आहेत अशा विद्यार्थ्यांना गुगल मिट या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ॲपच्या माध्यमातून शाळेतील सर्व शिक्षक नियमितपणे ऑनलाइन तासिका घेत आहेत. विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास विद्यार्थी व्हाट्सअपच्या माध्यमातून शिक्षकांना त्या-त्या वर्गांच्या ग्रुप वर पाठवत असतात. तर अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी 'शिक्षक आपल्या दारी' हा उपक्रम राबवला जात आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षणाचे सर्व पर्याय विद्यार्थ्यांसाठी शाळेतील सर्व शिक्षक कुशलतेने वापरत आहेत. याकामी शाळेला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, उपाध्यक्ष संजय परदेशी, सर्व सदस्य, गावातील एकवीरादेवी मंडळ व ग्रामस्थांचे सहकार्य लाभत आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

Record Breaking : १० चौकार, १२ षटकार! ३५३ च्या स्ट्राईक रेटने शतक; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भीमपराक्रम, २९ धावांत ९ गेल्या तरी संघ जिंकला

Latest Marathi News Updates : जयंत पाटील हे घाबरणारे नेते नाहीत - रोहित पवार

SCROLL FOR NEXT