जळगाव

रुग्णसेवेसाठी जळगावात धावणार ‘लाइफलाइन’ 

सचिन जोशी

जळगाव  : मराठी प्रतिष्ठान व रामलालजी चौबे मेमोरियल ट्रस्ट व यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहरात प्रथमच ‘बाइक ॲम्ब्युलन्स’ सेवा लवकरच सुरू करण्यात येत आहे. जिल्ह्यात किंबहुना महाराष्ट्रात अशा प्रकारचा हा पहिलाच सेवाभावी उपक्रम आहे.

‘ना नफा-ना तोटा’ या तत्त्वावर शहरातील रुणांना दवाखान्यातून घरी अथवा घरून दवाखान्यात ने-आण करण्यासाठी सेवा उपलब्ध होणार आहे. टू व्हिलर बाइक ॲम्ब्युलन्स सेवा महाराष्ट्रात प्रथमच जळगाव येथे सुरू होत आहे. ‘लाइफलाइन’ या नावाने सुरू होणाऱ्या या सेवेला रामलाल चौबे मेमोरियल ट्रस्टने शंभर टक्के अर्थसहाय्य केले आहे.

रविवारी लोकार्पण 

मराठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून बाइक ॲम्ब्युलन्स सेवा संचलित केली जाणार आहे. बाइक ॲम्ब्युलन्सची अंतर्गत/बाह्य सजावट केली आहे. रुग्णवाहिकेत स्ट्रेचर व फॅनची व्यवस्था असून, या बाइकला साइड कार असेल. या उपक्रमास रविवारी (ता. १०) सुरवात होत असून, रुग्णवाहिकेचे लोकार्पण होणार आहे. 

जळगाव शहरातील रुग्णांसाठी संजीवनी ठरू शकेल. बाइकवरील रायडर प्रशिक्षित असून, त्याला प्रथमोपचारांसंबंधी प्रशिक्षणही दिले जाणार आहे.

-ॲड. जमील देशपांडे 

 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Train: दिवसभरात १,४१४ लोकल फेऱ्या अन्...; गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा दिलासादायक निर्णय

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

SCROLL FOR NEXT