Broken benches on the banks of Mehrun Lake and in the second picture a broken and thrown away plaque of 'Swachh Shahr Sunder Shahr'. esakal
जळगाव

Jalgaon News : मेहरुण तलावाकाठी बाकड्यांची मोडतोड; संबंधितांवर कारवाईची मागणी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : दिवसभरात केव्हाही विश्रांतीचे दोन क्षण अनुभवता यावे व निवांत कुठेतरी बसता यावे म्हणून ज्येष्ठांसाठी काही दानशूर व्यक्तींनी मेहरुण तलावाकाठी बाक उपलब्ध करून दिले होते.

परंतु काही समाजकंटक यांनी या बाकड्यांची तोडफोड करून ज्येष्ठांचा निवांत बसण्याचा हक्कही हिरावून घेतला आहे. या संतापजनक कृत्याची महापालिका व पोलिस प्रशासनाने दखल घ्यावी व अशा संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे. (mehrun lake near seats are destroyed by unknown jalgaon news)

मेहरुण तलाव परिसर हा शहराला निसर्गाने दिलेली देणगी आहे. तलावकाठचा परिसर हिरवाई व जैवविविधतेने नटलेला असून तलावाकाठचा ट्रॅक म्हणजे पहाटे अबालवृद्धांसह महिलांच्या मॉर्निंग वॉकसाठी हक्काचे ठिकाण. तलावाकाठी सेंट टेरेसा स्कूलच्या बाजूने जाऊन श्रीकृष्ण लॉन्सच्या मागून दक्षिण बाजूने वळसा घालून पूर्वेकडे पक्षीघरामार्गे मेहरुण परिसराकडे जाता येते.

तलावाच्या सभोवताली निसर्गरम्य परिसरात पहाटेपासून सायंकाळपर्यंत नागरिकांचे तुरळक स्वरूपात येणे- जाणे असते. तलावाकाठच्या झाडांखाली नागरिक दोन क्षण निवांत बसून दु:ख विसरण्याचा प्रयत्न करतात. एक हौशी ग्रुप याठिकाणी ‘कराओके’वर गीतांची मैफील रोज जमवितात.

अशा निसर्गरम्य परिसरात दोन क्षण निवांत घालविणाऱ्यांसाठी शहरातील दानशूर व्यक्तींनी याठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी बाक उपलब्ध करून दिले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पक्षीघराकडे जाताना वृक्षांच्या दाट सावली खाली हे बाक बसविण्यात आले आहे. मात्र, शहरातील समाजकंटक यांनी तलावाकाठी बसविलेल्या बाकांची नासधूस करून ठेवलीय.

गेल्या काही दिवसांपासून विकृत तरुण या भागात येतात आणि हुल्लडबाजी करतात. त्यातूनच हे चांगले बाक तोडून त्यांचे तुकडे करण्यात आले आहेत. शुक्रवारी (ता.१) सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर तलावाकाठी नियमित फिरण्यास येणाऱ्या नागरिकांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

टवाळखोरांचा बंदोबस्त करा

गेल्या काही दिवसांत या चांगल्या परिसराला काही टवाळखोर यांनी आपला अड्डा बनविला आहे. हे तरुण याठिकाणी येऊन दारु पिऊन गोंधळ घालतात. त्यामुळे सामान्य लोकांचे या भागात फिरणेही कठीण झाले आहे. अशात या तरुणांनी बाकडे तोडून ठेवले. या टवाळखोरांचा वेळीच बंदोबस्त करावा, महापालिकेने या भागात सुरक्षा रक्षक नेमावे, तसेच पोलिसांनीही दिवसभरात गस्त घालून गोंधळ घालणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई करवी अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shambhuraj Desai: भाजपने हुकुमशाहीने प्रक्रिया राबवली: पालकमंत्री शंभूराज देसाई, ‘आगे आगे देखो होता है क्या...’

१५४.२ किमी! IPL मध्ये स्पीडचा बादशहा; कोण आहे हा अशोक शर्मा?

रणवीर तर ओके पण 'धुरंधर २' मध्ये अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत असते तर? लक्ष्यामामांचा व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

सागर कारंडे बिग बॉसच्या घरातून बाहेर? प्रेक्षक म्हणाले 'सोलो गेम खेळायला हवा होता'

Jaykumar Gore: ‘प्लॅन डी’ असता, तर चित्र वेगळे असते: ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे; त्यांना सदस्य संभाळता येत नाहीत!

SCROLL FOR NEXT