Dipression esakal
जळगाव

Mental Health : मनात नैराश्‍य येताच ‘हेल्पलाइन’ची साद! भादली येथील तरुणाचा अप्रिय घटना टाळण्यासाठी अनोखा उपक्रम

Jalgaon News : अशा घटना टाळण्यासाठी एकल, विधवा, परितक्त्या व्यक्तींचे पुनर्वसन व पुनर्विवाह अशा विविध मार्गांतून प्रयत्न होणे गरजेचे आहे.

रवींद्र शिंदे

जळगाव : समाजात विविध कारणांमुळे अनेक स्त्री व पुरुषांना एकल जीवन जगावे लागत आहे. यात अनेकांच्या मनात नैराश्‍येची भावनाही निर्माण होते. त्यातून काही अप्रिय घटनाही घडतात. अशा घटना टाळण्यासाठी एकल, विधवा, परितक्त्या व्यक्तींचे पुनर्वसन व पुनर्विवाह अशा विविध मार्गांतून प्रयत्न होणे गरजेचे आहे. असाच काहीसा प्रयत्न भादली बुद्रुक येथील एका तरुणाने ‘हेल्पलाइन’च्या माध्यमातून सुरू केला. (Mental Health depression comes to mind helpline available)

समाजातील काही परंपरांमुळे अनेक महिला पुनर्विवाह करीत नाहीत, काही समाजात तशी मान्यताही नाही. अनेक महिलांना कोणतीही चूक नसताना वैवाहिक आयुष्याच्या सुरवातीलाच किंवा मध्यावर पतीच्या अकाली निधनाने विधवेचे जीवन जगावे लागते. काही महिला घटस्फोटित, तर काही परितक्त्या, अशांना समाजात वावरताना एकाकी जीवन जगताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

खरं तर, आज महिला कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत. सर्वच क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. मात्र, जोडीदार शोधणे अनेक महिलांना आजही शक्य नाही. त्यामुळे एकल जीवन नशिबी येते. दुसरीकडे समाजात सध्या मुलींची संख्या कमी झाली आहे. नोकरी, रोजगार, व्यवसाय असूनही अनेक विवाहयोग्य तरुणांना मुली मिळत नाहीत.

अनेक समाजात तर, मुलीच मिळत नाहीत. काही समाजात कोणतीही मुलगी चालेल, अशीही परिस्थिती आहे. म्हणून अशा एकल, विधवा, परितक्त्या जीवन जगणाऱ्या व्यक्तींच्या समस्या जाणून घेऊन त्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी हेल्पलाइन सुरू करण्याचे प्रयत्न प्रमोद चावदस पाटील (रा. भादली बुद्रुक, ता. जि. जळगाव) यांनी सुरू केले आहेत. (latest marathi news)

संस्था, प्रकल्पांची माहिती देण्याचे आवाहन

धकाधकीच्या काळात आज कोणालाच कोणासाठी वेळ नाही. त्यातच विविध कारणांमुळे एकल जीवन जगणारे, वृद्धावस्थेत आजाराने ग्रस्त अशा निराधारांना संघर्षमय जीवन जगावे लागत आहे. अशा व्यक्तींना माणुसकी धर्मातून काही दानशूर व्यक्ती, संस्था प्रत्यक्षरीत्या सेवा प्रकल्पांतर्गत काही ठिकाणी कार्यरत आहेत. त्यात काही लोकं निराधारांसाठी पूर्णपणे सेवा देतात. अशा प्रकारे समाजाहितार्थपणे सेवा देणाऱ्या संस्था, व्यक्ती, प्रकल्पांची माहिती ‘हेल्पलाइन’साठी देऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रमोद पाटील यांनी केले आहे.

"एकल जीवन जगणाऱ्या व्यक्तींच्या समस्या सुटून त्यांचेही जीवन सुकर होण्यासाठी ‘हेल्पलाइन’ काढण्याचा माझा हा प्रयत्न आहे. समाजात आज विविध धर्म, जात, पंथ भेद असो की, गरीब-श्रीमंत, ग्रामीण-शहरी, शिक्षित-अशिक्षित, शेतकरी, शेतमजूर, नोकरदार, विविध प्रांतीय, भाषिक भेद, स्त्री-पुरुष भेद आदी विषमता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण होते. ही विषमता दूर करण्यासाठी विविध व्यक्ती, संस्था, समूह कार्य करीत आहेत. अशा संस्था व व्यक्तींच्या सहकार्याने एकल जीवन जगणाऱ्यांसाठीही काम करता येईल, असे मला वाटते. म्हणून याबाबत पुढाकार घेणाऱ्या समाजातील इच्छुकांनी मार्गदर्शन व सूचना ९३२६३५९२२९ या क्रमांकावर पाठवाव्यात."

- प्रमोद चावदस पाटील, भादली बुद्रुक, ता. जि. जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who Is Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा कोण? मध्यरात्री अचानक मोठे फेरबदल

Latest Marathi News Live Update : राज्याचा अर्थसंकल्प आज विधीमंडळात; कोणत्या घोषणा होणार?

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! शेतकऱ्यांना ‘या’ दिवशी मिळणार पीकविम्याचे २४०० कोटी; एप्रिलमध्ये सन्मान निधीचे प्रत्येकी ६००० रुपये मिळणार, वाचा...

बांधकाम कामगार नोंदणीत घोटाळा! ४ वर्षांत सोलापुरात वाढले सव्वालाख कामगार; एजंटांनी पैसे घेतले, ठरावीक ठेकेदारांनी दिली अनुभव प्रमाणपत्रे, वाचा...

ढिंग टांग : पुण्याची गणना कोण करी..? (एका भावी खासदाराची डायरी)

SCROLL FOR NEXT