Attractive lighting done by the municipality under the 'Meri Mitti Mera Desh' campaign. esakal
जळगाव

Meri Mitti Mera Desh Campaign: अमळनेर शहर रोषणाईने उजळले! नगरपलिकेतर्फे विविध उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

Amalner News : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सांगताप्रसंगी अमळनेर नगरी तिरंगी रोषणाईने उजळली आहे.

रस्त्यावरील तीन रंगाच्या लायटिंगमुळे प्रवास करणाऱ्यांच्या मनात देशभक्ती जागृत होत आहे. (Meri Mitti Mera Desh Campaign Amalner city lit up with lights Various activities by municipality jalgaon)

‘मेरी मिट्टी मेरा देश’ या अभियांनातर्गत शहरात माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिक यांचा सन्मान करण्यासोबत विविध ठिकाणी सुशोभीकरण करण्यात आले आहे. चोपडा - धुळे रस्त्यावर तिरंगा चौकात १०५ फुटी तिरंगा डौलाने फडकत आहे.

त्याच्याच खाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अभिवादन करणारा संदेश असलेले शिलाफलक उभारण्यात आला आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या संकल्पनेतून पथदिव्यांच्या खांबांना भारताच्या तिरंगा झेंड्याच्या रंगाप्रमाणे केशरी, पांढरा, हिरवा अशी लायटिंग लावण्यात आली आहे.

यामुळे शहराच्या सौंदर्यात तर भर पडली आहे. त्यासोबत प्रत्येकाच्या मनात देशभक्ती उफाळून येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला निरोप देण्यासाठी प्रत्येक प्रभागातून माती गोळा करून तिचा कलश बनवून जिल्ह्यावर रवाना करण्यात येणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तसेच हा कलश दिल्ली येथे पाठवण्यात येणार आहे. या वेळी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, नगर अभियंता अमोल भामरे, अभियंता दिगंबर वाघ, विद्युत अभियंता प्रशांत ठाकूर, स्वच्छता निरीक्षक संतोष बिऱ्हाडे, स्वच्छता निरीक्षक हैबतराव पाटील हजर होते.

पंचतत्वांची शपथ घेण्यात आली. दरम्यान, रविवारी (ता. १३) विविध शासकीय कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. वीरांना, देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

विविध शासकीय कार्यालयातील उपक्रम पाहता शहरात अनेक ठिकाणी देशभक्ती गीतांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

तर सोमवारी (ता. १४) सकाळी दहाला तिरंगा चौकात मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते शिलाफलकचे अनावरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सैनिक व माजी सैनिक तसेच कुटुंबीयांचा सत्कार करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

IND vs ENG 2nd Test: इंग्लंडच्या खेळाडूने रिषभ पंतला दाखवलं 'आमिष'; आपल्या पठ्ठ्याने काय उत्तर दिले पाहा, Viral Video

SCROLL FOR NEXT