Parents, Deputy Superintendent of Police Pawar, Inspector Jaipal Hire and the police team along with the missing children.  esakal
जळगाव

Jalgaon News : बेपत्ता मूकबधिर मुले पालकांच्या कुशीत...!

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : कुसुंबा (ता. जळगाव) येथील सहावर्षीय मूकबधिर व चारवर्षीय बालक बेपत्ता झाले होते. एमआयडीसी पोलिसांनी या दोन्ही बालकांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन केले. (MIDC police handed over missing deaf and mute children to their parents jalgaon news)

रायपूर कुसुंबा येथीलजयसिंग परदेशी यांचा सहवर्षीय मूकबधिर मुलगा कार्तिक व त्याच्यासोबत प्रियांशू अजयकुमार वर्मा (वय ४), असे दोघे घरात काहीही न सांगता बेपत्ता झाले होते.

दोघांच्या पालकांनी एमआयडीसी पोलिसांत याबाबत तक्रार दिली होती. दोघे बालक भटकत असताना, रिजवान शेख गनी (रा. कानळदा रोड) यांना मिळून आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यांनी तत्काळ एमआयडीसी पोलिसांना कळविले.

सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, इम्तियाज खान, सचिन पाटील, साईनाथ मुंडे, निलोफर सय्यद यांनी दोन्ही बालकांना ताब्यात घेतले.

पोलिस उपअधीक्षक पवार, निरीक्षक जयपाल हिरे यांच्या उपस्थितीत दोन्ही बालकांना त्यांच्या पालकाच्या स्वाधीन करण्यात आले. हरविलेली मुले सुखरूप परत मिळवून दिल्याबद्दल पालकांनी पोलिसांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT