Relief and Rehabilitation Minister Anil Bhaidas Patil during the groundbreaking ceremony of the road work. Neighbor officials and activists. esakal
जळगाव

Anil Patil News : अमळनेरच्या चौकांमध्ये झळकणार रंगीत पथदीप; मंत्री अनिल पाटील

सकाळ वृत्तसेवा

Anil Patil News : शहरातील प्रमुख रस्त्यांवर विविध रंगाचे पथदीप लावून शहराची वेगळी ओळख निर्माण केली जाते. त्याचप्रमाणे अमळनेर शहरातील सर्व प्रमुख चौक वेगळ्या खांबाद्वारे एकाच रंगाच्या पथदीपांनी सजवून वेगळी ओळख निर्माण करण्यासह चौक सुशोभित करण्याचा मानस राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी शहरातील रस्त्यांच्या भूमिपूजनप्रसंगी व्यक्त केला. (Minister Anil Patil statement on Colorful street lamps would shine in Amalner jalgaon news)

शहरातील मुख्य बाजारपेठ व न्यू प्लॉट परिसरात अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने व नगरपरिषदेच्या माध्यमातून मंजूर झालेल्या प्रमुख रस्त्यांचा भूमिपूजन सोहळा मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते पार पडला. सुरवातीला लालबाग ते बोहरी पंप या रस्त्याचे व्हाईट बिल्डिंग शाळेजवळ पहिले भूमिपूजन झाले.

त्यानंतर लागलीच पोस्ट ऑफिसजवळ मंगलमूर्ती ते पोस्ट ऑफिस आणि सेवा स्टाईल ते स्टेट बँक या दोन रस्त्यांचे भूमिपूजन झाले, पुढे सचदेव जनरल जवळ सचदेव ते पाचपावली रस्त्याचे भूमिपूजन होऊन शेवटी सुभाष चौकात सुभाष चौक ते तिरंगा चौक रस्त्याचे भूमिपूजन पार पडले.

या वेळी नागरिकांनी मंत्री अनिल पाटील यांचे प्रत्येक चौकात फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल ताश्यांचा गजर करत बुके देऊन स्वागत केले आणि जाहीर आभारही व्यक्त केले. न्यू प्लॉट परिसर विकास मंच आणि व्यापारी बांधव यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी न्यू प्लॉट परिसर विकास मंचचे अध्यक्ष चेतन राजपूत यांनी या भागातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे नूतनीकरण करून सर्व प्रमुख रस्त्यांना निधी मंजूर केल्याबद्दल आभार व्यक्त केले. तर मंत्री अनिल पाटील यांनी इतर राहिलेले रस्ते देखील टप्प्याटप्प्याने पूर्ण होतील, अशी ग्वाही दिली.

या वेळी महावीर पतपेढीचे संचालक प्रकाशचंद्र पारेख, खा. शि. मंडळाचे संचालक नीरज अग्रवाल, माजी कार्याध्यक्ष जितेंद्र जैन, डॉ. संजय शाह, मकसूदभाई बोहरी, एहसान बोहरी, अलिहुसेन बोहरी, अजिज बोहरी, हुसेन बोहरी, अहमदी बोहरी, शब्बीर तज्मुल हुसेन, जुवेब नज्मुल, अब्दुल कादीर, अबुभाई बुकवाला, शैफुद्दीन हुसेन, सामाजिक कार्यकर्ते पंकज साळी, ॲड. विवेक लाठी, सुनील सेठ, राजेंद्र सेठ, प्रसाद शर्मा, मिलिंद भामरे, प्रवीण पारेख, विजय कटारिया, विजय माहेश्वरी, राकेश माहेश्वरी,आकाश माहेश्वरी, प्रा.सुरेश पाटील, मुख्तार खाटीक, अशोक हिंदुजा, किरण पाटील,माजी नगरसेवक नरेंद्र संदानशिव,विवेक पाटील,लिओ क्लब अध्यक्ष प्रणित झाबक,सोमचंद संदानशिव दत्ता कासार, देवदत्त संदानशिव, भगवान पाटील, नितीन निळे, डॉ.किरण शहा आदी कार्यकर्ते तसेच व्यापारी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, बोहरी समाज बांधव, तरुण मंडळी, भाजी विक्रेते, लघु व्यावसायिक व नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, मानाचे गणपती मार्गस्थ, गणेश भक्तांचा उत्साह

BCCI Sponsorship 2025 : नव्या प्रायोजकातून बीसीसीआय ४०० कोटींहून अधिक कमवणार? नेमका प्लॅन काय?

Ladki Bahin Scheme : 'या' कारणामुळे ‘लाडकी बहीण’ ठरणार अपात्र, नवा नियम काय सांगतो

Pune Rain : पुणे परिसरात आज पावसाचा अंदाज; बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता

Red - White Onion: लाल आणि पांढरा कांदा खाताय? हे नक्की वाचाचं

SCROLL FOR NEXT