Minister Girish Mahajan assures Damage farmers will get help jalgaon news esakal
जळगाव

Girish Mahajan News : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळेलच; मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही

सकाळ वृत्तसेवा

Girish Mahajan News : रासायनिक खते वापरल्याने पिकांच्या झालेल्या नुकसानाची मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्यक्ष शेतांमध्ये जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या.

संबंधित कंपनी मालकाच्या घरी आपण पोलिस बसवून ठेवले आहेत. आपण त्यांच्याकडून सर्व पैसे वसूल करू. प्रसंगी कंपनीच्या मालकाला त्याची कंपनी विकून त्याच्याकडून वसुली करायची आहे. त्यामुळे कोणालाही ग्राहक न्यायालयात जावे लागणार नाही असे आश्‍वासन मंत्री महाजन यांनी शेतकऱ्यांना दिले. (Minister Girish Mahajan assures Damage farmers will get help jalgaon news)

या पाहणीप्रसंगी शेतकऱ्यांनी मंत्रिमहोदयांना सांगितले, की आम्हाला दुकानदाराने फसविले असून पाच दिवसात मदत देतो, असा शब्द त्याने दिला व तो आता फरार झाला असून आम्हाला कुठलेही सहकार्य करायला तयार नाही. संबंधित दुकानदाराने आम्हाला तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

त्यावर मंत्री महाजन यांनी दुकानदाराने पळून न जाता, शेतकऱ्यांना सहकार्य करायला पाहिजे होते. ही त्याची चूक आहे. दुकानदार काही स्वतःची मालमत्ता विक्री करून सर्वांना भरपाई देऊ शकला नसला तरी शेतकऱ्यांसोबत राहून त्याने अधिकाऱ्यांकडे जाऊन व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शेतकऱ्यांना मदत करायला हवी असे त्यांनी सांगितले.

सरदार कंपनीच्या या खतांचा विषय संपूर्ण महाराष्ट्राचा झाला आहे. तेव्हा हा काही एका दुकानदाराचा विषय नाही. त्यामुळे शासनातर्फे कंपनीच्या मालकाविरूद्ध तक्रार निवारण मंचाकडे जाऊन शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई मिळवून देऊ, असेही मंत्री महाजन यांनी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यावेळी जे. के. चव्हाण, चंद्रकांत बावस्कर, तहसीलदार नानासाहेब आगळे, उपविभागीय कृषी अधिकारी रमेश जाधव, तालुका कृषी अधिकारी अभिमन्यू चोपडे, राजू ढेपले यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकरी प्रताप भुतेकर, संतोष साबळे, कडुबा जिरी, सुधाकर पाटील, अशोक भिसे, सुरतसिंग जोशी, पितांबर पाटील, धनराज राजपूत, संजय गव्हाणे, रवींद्र पाटील, आत्माराम पाटील यांच्यासह रंगनाथ काळे, डॉ. दिलीप पाटील, सचिन पाटील, संजय पाटील, सुभाष बावस्कर, विठ्ठल दांगोडे, महेंद्र खिवसरा, ईश्वर निंबाळकर, ईश्वर राठोड आदी उपस्थित होते.

"भेसळयुक्त खतांची विक्री करुन नफेखोरी करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई झालीच पाहिजे. अशा प्रकारांना आळा बसावा, यासाठी शेतकऱ्यांना फसविणाऱ्या खत विक्रेत्यांचे परवाने रद्द करावे व त्यांना किंवा त्यांच्या घरात कोणालाही दुसरा परवाना देऊ नये. म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही." - प्रताप भुतेकर, प्रगतीशील शेतकरी, तोंडापूर (ता. जामनेर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : 'काही तरी प्लॅनिंग सुरूय...' वडिलांना आधीच सावध केलं होतं; प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलाचा मोठा दावा

Apple Pay आता भारतात सुरू; Axis Bankच्या कार्डधारकांना मिळणार सुविधा, जाणून घ्या कसं वापराचं

‘सारेगमप’चं शूटिंग संपवून ट्रेनने घरी निघाले, अन् पहिले पीरियड्स आले'; श्रेया घोषाल आठवण सांगत म्हणाली, 'वडिलांनी पॅड आणलं आणि..'

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

Uttarakhand: स्कूटी चालवून महिला कमावताहेत २० हजार रुपये! फ्लिपकार्ट, मिंत्रा ते ब्लिंकिट-स्विगीमध्ये संधी

SCROLL FOR NEXT