जळगाव

भाजपचा उद्देश खोटा ठरला ! ज्यांनी भूमिपूजन केले त्यांच्याच हस्ते जलपूजन करू 

योगेश महाजन

अमळनेर : एकनाथराव खडसे यांनी जे जे प्रकल्प हाती घेतले ते पूर्ण होऊ द्यायचे नाही असा भाजपचा उद्देश होता. म्हणूनच पाडळसे प्रकल्प रखडलेला दिसतो. मात्र, खडसे यांनी या प्रकल्पाचे भूमिपूजन केले आहे. आता अडीच ते तीन वर्षात धरणाचे काम पूर्ण करून त्यांच्याच हस्ते जलपूजन करू, असे आश्वासन जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांनी तालुक्यातील पाडळसे येथील धरणाच्या पाहणीप्रसंगी दिले.

ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, अरुणभाई गुजराथी, मनीष जैन, गफ्फार मलिक, आमदार अनिल भाईदास पाटील, लता सोनवणे, माजी आमदार साहेबराव पाटील, जयश्री पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

जलसंपदा मंत्री होणार असे वाटले नव्हते

जयंतराव पाटील पुढे म्हणाले, की निवडणुकीच्या वेळी मी सभेला आलो होतो त्यावेळी गर्दी पाहून मी म्हणालो होतो की सीट आपलीच आहे. राष्ट्रवादीचा आमदार निवडून द्या. आम्ही सत्ता आल्यावर धरण पूर्ण करू. निवडणुकीनंतर मात्र असे वाटले नव्हते की सत्ता आपली येईल व आपण जलसंपदा मंत्री पण आपण होऊ म्हणाले.

अडीच वर्षात धरणाचे काम पूर्ण करू

पाडळसे धरणाचे सुधारित डिझाईन लवकरच प्राप्त होणार आहे. त्यानंतर धरणाचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू होईल. हे काम सुरू झल्यानंतर आपण बंद पडू देणार नाहीत. येत्या अडीच ते तिन वर्षात धरणात उपयुक्त जलसाठा होईल एवढ्या कामाचा पुरेसा निधी आपण उपलब्ध करून देऊ अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी आमदार अनिल पाटील, एकनाथराव खडसे यांनीही मनोगत व्यक्त केले. रणजित शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. तापी पाटबंधारे विभागाच्या अभियंता श्रीमती देशमुख यांनी आभार मानले.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोनं स्वस्त! सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; उच्चांकापेक्षा ₹27 हजारांनी कमी, पाहा आजचा भाव

Jalgaon Crime : जळगाव हादरलं! गणपतीच्या तयारीदरम्यान सैनिकाच्या पत्नीनं 5 वर्षांच्या चिमुरड्यासह पंख्याला ओढणीच्या सहाय्याने घेतला गळफास

आशिया कपची ट्रॉफी जिंकली, पण टीम इंडियाची ‘ही’ कमकुवत बाजू आली समोर; ५ सामन्यांत १३ झेल सोडले, मुझुमदार म्हणाले- सुधारण्यासाठी मेहनत सुरू

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Rajaram Puri Ganesh Procession : पहिल्याच दिवशी ओलांडली आवाजाची मर्यादा राजारामपुरी गणेश आगमन मिरवणूक ; आकर्षक विद्युत रोषणाई, ‘सिग्नल’मुळे वेळेचे गणित बसले

SCROLL FOR NEXT