Arrested News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तीन महिन्यांपूर्वी तालुक्यातील अंतुर्ली येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा तरुण तिच्या सख्या मावशीचा मुलगा निघाला असून, मारवड पोलिसांनी मुलीच्या जबाबावरून धुळे जिल्ह्यातील चिंचवार येथील तरुणाला बलात्कार आणि पोस्को कायद्यानुसार अटक केली आहे.

अंतुर्ली येथे ३ मार्चला रात्री एका मजूर महिलेची मुलगी झोपली होती. सकाळी सहापूर्वी ती गायब झाल्याने मारवड पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता.

सहाय्यक पोलिस निरीक्षक शितलकुमार नाईक यांना मिळालेल्या माहितीवरून संशयित आणि मुलगी धुळे एमआयडीसीत वास्तव्यास असल्याचे समजले. (minor girl Abduction arrested Jalgaon Crime News)

त्यावरून हवालदार संजय पाटील, मुकेश साळुंखे, उज्वल पाटील यांनी संशयित आणि मुलीला ताब्यात घेऊन मारवड पोलिस ठाण्यात आणले.

मुलीला पळवून नेणारा हिरालाल सोमनाथ मोरे (वय २३, रा. चिंचवार, जि. धुळे) मुलीचा मावसभाऊच असल्याचे समजले आणि त्याने ३ मार्चला दुचाकीवरून पळवून नेल्याचे सांगितले. हवालदार रेखा ईशी व मारवड येथील प्रतिष्ठित महिलेच्या समक्ष अल्पवयीन मुलीचा जबाब घेण्यात आला.

तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. तरुणीचा जबाबावरून संशयिताविरुद्ध अपहरणासह भादंवि कलम ३७६ व पोस्को कायद्याचे कलम वाढवून त्याला अटक करण्यात आली. मुलीला महिला बाल सुधारगृहात रवाना करण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: शेअर मार्केट Crash मध्येही हे 10 शेअर्स ठरले धुरंधर! आठवड्यात 40% रिटर्न; तुमच्याकडे आहेत का?

Mumbai News: मुंबईतील ट्रायडंट हॉटेल अडचणीत! बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा आदेश; बीएमसीचा अल्टिमेटम, प्रकरण काय?

'T20 वर्ल्ड कपमधून डच्चू मिळाला, आता शुभमन गिल... ', पुजाराचे IPL 2026 साठी गुजरात टायटन्सबाबत मोठं भाकीत

Baby Girl Born : गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कन्यारत्नाचे आगमन... आणि तेही रुग्णवाहिकेत! ; ‘१०८’ टीम ठरली देवदूत

Latest Marathi News Live Update : अमेरिका-इराण युद्धामुळे निर्यात होणाऱ्या केळी, द्राक्ष, डाळींबाचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT