Rape News esakal
जळगाव

Jalgaon Crime : जळगाव हादरलं! अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत दगडानं हत्या; चिमुरडी दोन दिवसांपासून होती बेपत्ता

रोहित कणसे

जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात एक धक्कादायक प्रकर समोर आला आहे. या घटनेलतील संशियीतास पोलिसांनी अटक केली आहे. गावात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गावातील बेपत्ता आठ वर्षीय चिमुकलीचा गुरांच्या गोठ्यात मृतदेह आढळून आला होता.

जळगाव जिल्ह्यातील या घटनेने महाराष्ट्र हदरला असून मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर झालेल्या झटापटीत मुलीच्या डोक्यात दगड टाकून तिची हत्या केल्याची कबूली संशयिताने दिल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान गुन्ह्याच्या पडताळणीसाठी घेऊन जात असताना संतप्त ग्रामस्थांनी वहानावर दगडफेक केल्याचा प्रकार देखील घडला. या घटनेत तीन पोलिस देखील जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी ही मुलगी तिच्या गावातून गायब झाली होती. यानंतर कुटुंबियांकडून या मुलीचा सर्वत्र शोध घेतला जात होता. त्यानंतर एका ठिकणी दुर्गंधी येत असल्यामुळे पाहिले असता गोठ्यातील चाऱ्यात मुलीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांकडून या प्रकरणी चौकशी सुरू केली असता एका तरुणाच्या हलचाली संशयास्पद आढळून आल्या होत्या. चौकशीनंतर पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Wildlife: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! अंबा नदीत आढळला परदेशी व दुर्मिळ 'अल्बिनो एलीगेटर गार' मासा; रायगडमध्ये दुर्मिळ परदेशी माशाचा शोध

सई ताम्हणकरच्या 'बोल बोल राणी' मधलं 'सुपरनोव्हा' गाणं प्रदर्शित; पण सुपरनोव्हा म्हणजे काय?

Latest Marathi News Live Update : पालखीच्या पुणे मुक्कामादरम्यान 72 संशयित चोर पोलिसांच्या ताब्यात

Pune Crime: पुण्यात धक्कादायक प्रकार! पत्नीशी वादानंतर पतीने घर पेटवले; तीन पाळीव मांजरांचा मृत्यू

Kinwat Forest Department: किनवट वन विभागाला हायकोर्टाचा झटका; RTI माहिती न दिल्याप्रकरणी अधिकाऱ्याला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT