crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : दारूड्या मुलाच्या हातून गावठी कट्टा हिसकवताना मिसफायर

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : जळगाव शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढतच असून, दारूच्या नशेतील मुलाच्या हातून गावठी कट्टा हिसकवणाऱ्या आईलाच गोळी लागून ती गंभीर जखमी झाली.

मुलाविरुद्ध शहर पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली.(Misfire while snatching Gavthi Katta from hands of drunk boy jalgaon crime news)

कलाबाई प्रकाश सोनवणे (वय ६०) महापालिकेच्या आरोग्य विभागातून निवृत्त झाल्या असून, शिवाजीनगर नागलो प्रोव्हिजन येथे पती प्रकाश, मुलगा रोहित व ईश्वर, सुना काजल, कविता अशा एकत्र कुटुंबात राहतात.

शनिवारी (ता. ११) रात्री साडेनऊच्या सुमारास कलाबाई घरात असताना त्यांचा मोठा मुलगा रोहित दारूच्या नशेत गावठी पिस्तूल घेऊन आला. कलाबाई यांनी कट्टा हिसकवण्याचा प्रयत्न केला असता गोळीबार होऊन कलाबाई यांच्या उजव्या हाताच्या मनगटात गोळी शिरली.

सून काजल सोनवणे यांनी कलाबाई यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात येऊन गोळी काढण्यात आली. मुलगा रोहित सोनवणे याच्याविरुद्ध शहर पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली. सहाय्यक निरीक्षक किशोर पवार तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS तुकाराम मुंढेंना मातृशोक, पुण्यात आईचं निधन; बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

Satara District Bank: राज्य सरकारकडून सातारा जिल्हा बँकेच्या भरतीला स्थगिती; भरती प्रक्रियेत गैरव्यवहार, कायदेशीर लढ्याला यश!

Latest Marathi News Live Update : दक्षिण रायगडमध्ये ढगाळ वातावरण; जोरदार वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा

Karad News: अतिक्रमणे हटवली; हॉकर्स झोन करा, कऱ्हाडला हातगाडाधारक आग्रही; किरकोळ विक्रेत्यांसाठी नियोजनबद्ध जागेची मागणी

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या उत्तरानंतर ग्रीनने घेतला बॉल हातात, KKR साठी गोलंदाजीला आजच उतरणार?

SCROLL FOR NEXT